जागतिक चहा दिन : चहा प्या… शरीराला, मनाला तरतरी आणा!

Published on
Updated on

आज जागतिक चहा दिन. आपल्यापैकी प्रत्येकाचा दिवस गरमागरम चहाने सुरू होतो. चहा घेतल्याशिवाय अनेकांना ताजेतवाने वाटत नाही. चहा घेतल्यानंतर पुढचा दिनक्रम व्यवस्थित सुरू होतो, अशी अनेकांची भावना असते. सकाळी चहा घेतल्यानंतर दिवसातून किमान तीन-चार वेळा तरी या ना त्या निमित्ताने आपण चहा घेत असतो. झोप आली, कंटाळा आला यासारखी कारणे चहा घेण्यासाठी दिली जातात. अशा या चहाचे आपल्या आरोग्यात मोठे महत्त्व आहे हे अनेकांना ठाऊक नाही.

शरीराला आणि मनाला तरतरी आणणार्‍या या पेयामध्ये आरोग्याला उपकारक ठरतील असे अनेक गुणधर्म आढळून येतात. आपले आरोग्य राखण्याकरीता चहाचे असलेले महत्त्व वैद्यकीय संशोधनातून आढळून आले आहे. जगभरातील संशोधकांनी आपले आरोग्य निरामय राखण्यात चहाची भूमिका महत्त्वाची असते, असा निर्वाळा दिला आहे. नियमित चहा घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा दावा काही संशोधकांनी केला आहे. चहामध्ये असलेले विशिष्ट गुणधर्म शरीरातील कोलेस्टरॉल वाढीस प्रतिबंध करतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याचबरोबरच ज्यांना उच्च रक्‍तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्‍तींचा रक्‍तदाब नियंत्रित राखण्यात चहाची मदत होते, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. ग्रीन टीचे महत्त्व या पूर्वीच संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र ग्रीन टी बरोबरच आपण जो चहा पितो त्यामध्येही अनेक औषधी गुणधर्म आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. चहामध्ये फ्लॅवोनाईड नावाचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात हे अ‍ॅन्टीऑक्सिडंट हृदयविकार, रक्‍तदाब, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्याची भूमिका पार पाडतात, असा संशोधकांचा दावा आहे.

चहामधील अनेक घटकांमुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा ग्रीन, ब्लॅक टीचा एक कप घेतला पाहिजे. ग्रीन टी बरोबरच ब्लॅक टी मध्येही शरीरातील चरबी जाळण्याची क्षमता असते, असे संशोधनात आढळले आहे. वजन कमी करण्याकरीता आपण अनेकजन आहारावर निर्बंध आणतो. वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा यासाठीचा सल्‍ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र आपण सकाळी उठल्या उठल्या घेत असलेल्या चहामध्येही वजन नियंत्रणात आणण्याची क्षमता आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. चहामधील कॅटेचिन या घटकात आपल्या शरीरातील उष्मांक (कॅलरी) जाळण्याची मोठी क्षमता आहे, असेही संशोधकांना आढळून आले आहे.

हाडे मजबूत बनविण्याकरिता आणि हाडांची ताकद वाढविण्याकरीता चहाचे सेवन उपयुक्‍त ठरते. वयोमानानुसार हाडे ठिसूळ होऊ लागतात. हाडे ठिसूळ होऊ लागल्याने सांधेदुखीसारख्या अनेक व्याधी आपल्या मागे लागतात; मात्र नियमित चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात. ज्यांना उच्च रक्‍तदाबाच्या व्याधीचा त्रास आहे, अशा रुग्णांसाठी चहा उपयुक्‍त ठरतो. नियमित चहा घेण्याने उच्च रक्‍तदाब कमी होतो. शरीराला ऊर्जा पुरविण्याचे कामही या पेयाद्वारे होत असते. शरीरात आलेला आळस दूर करण्याचे सामर्थ्य चहामध्ये असतेच याखेरीज आपली प्रतिकारशक्‍ती वाढवण्याचे कामही चहाद्वारे होते. याखेरीज रक्‍तशर्करा नियंत्रणात ठेवण्याचे कामही चहामुळे होते. यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांकरीता चहा हे चांगले औषध आहे. वेगवेगळ्या स्नायूंची क्षमता वाढवण्याचे कामही चहामुळे होते. कर्करोगाची निर्मिती करणार्‍या अनेक पेशींना प्रतिबंध करण्याचे काम चहातील काही घटकांमुळे होते, असे संशोधनातून दिसले आहे. अनेक प्रकारच्या कर्करोगाशी लढण्यात चहाचा फायदा होतो.

हाडे मजबूत बनविण्याकरीता आणि हाडांची ताकद वाढविण्याकरीता चहाचे सेवन उपयुक्‍त ठरते. वयोमानानुसार हाडे ठिसूळ होऊ लागतात. हाडे ठिसूळ होऊ लागल्याने सांधेदुखीसारख्या अनेक व्याधी आपल्या मागे लागतात; मात्र नियमित चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात. ज्यांना उच्च रक्‍तदाबाच्या व्याधीचा त्रास आहे, अशा रुग्णांकरिता चहा उपयुक्‍त ठरतो. नियमित चहा घेण्याने उच्च रक्‍तदाब कमी होतो. शरीराला ऊर्जा पुरविण्याचे कामही या पेयाद्वारे होत असते. शरीरात आलेला आळस दूर करण्याचे सामर्थ्य चहामध्ये असतेच याखेरीज आपली प्रतिकारशक्‍ती वाढवण्याचे कामही चहाद्वारे होते. याखेरीज रक्‍तशर्करा नियंत्रणात ठेवण्याचे कामही चहामुळे होते. यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांकरीता चहा हे चांगले औषध आहे. वेगवेगळ्या स्नायूंची क्षमता वाढवण्याचे कामही चहामुळे होते. कर्करोगाची निर्मिती करणार्‍या अनेक पेशींना प्रतिबंध करण्याचे काम चहातील काही घटकांमुळे होते, असे संशोधनातून दिसले आहे. अनेक प्रकारच्या कर्करोगाशी लढण्यात चहाचा फायदा होतो.

चहाचे कोणकोणते प्रकार आरोग्याला कसे उपयुक्‍त ठरतात?

1) ब्लॅक टी – चहाचा हा सर्वमान्य प्रकार आहे. जगातील चहा घेणार्‍या एकूण व्यक्‍तींपैकी 75 टक्के व्यक्‍ती असा चहा घेत असतात. भारत हा जगातील मोठा चहा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. ईशान्येकडील आणि दक्षिणेकडील राज्यात चहा, कॉफीचे उत्पादन घेतले जाते. आपण दररोज पित असलेल्या चहाच्या एका कपामध्ये 40 मिलीग्रॅम एवढे कॅफीन असते.
2) ग्रीन टी – अलीकडे आरोग्याच्या द‍ृष्टीने ग्रीन टी चा बोलबाला झाला आहे. ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाच्या अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठे असते. एका कपात 25 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात कॅफीन हा घटक ग्रीन टी मध्ये सापडतो. अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठे असल्याने ग्रीन टी हा हृदयविकारावर उपयुक्‍त समजला जातो.
3) ओलोंग टी – हा चहा आपण दररोज घेत असलेल्या चहा सारखाच असतो. मात्र या चहाची पाने थोड्याच वेळेकरीता फरमेंट केली असतात. यामुळे या चहाची चव चांगली असते. या चहाच्या एका कपामध्ये 30 मिलीग्रॅम एवढे कॅफीन असते. आपल्या शरीरात चरबी साठवणारी जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला प्रतिबंध करण्याचे काम या चहातील काही घटकांमुळे होते.
4) व्हाईट टी – चहाच्या झाडाची पाने खूपच कोवळी असताना खुडली जातात आणि त्यापासून हा चहा बनवला जातो. कोवळ्या पानांपासून बनवला जात असल्याने या चहाचा स्वाद कडक नसतो. अन्य चहापेक्षा व्हाईट टी मधील कॅफीनचे प्रमाण कमी असते. एक कप व्हाईट टी
मध्ये 15 मिलीग्रॅम एवढे कॅफीन आढळून येते. असा चहा सुट्टा खरेदी केल्यास तो आरोग्याच्या द‍ृष्टीने अधिक फायदेशीर असतो. याचे कारण सुट्ट्या चहावर कमी प्रक्रिया केलेली असते. या चहामध्ये कॅन्सरला प्रतिबंध करणारे काही घटक आढळून आले आहेत.
5) सुगंधी चहा (फ्लेवर्ड टी) – चहाला विशिष्ट प्रकारचा वास येण्याकरीता त्यामध्ये दालचिनी, संत्र्याची साल घातली जाते. ब्लॅक, ग्रीन आणि व्हाईट या चहांमध्ये हे पदार्थ घातल्यास सुगंधी चहा तयार होतो. या चहामध्ये अन्य चहाप्रमाणेच अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण असते. त्यामुळे या चहाचाही आरोग्याला मोठा फायदा होतो.

– जान्हवी शिरोडकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news