औरंगाबाद : डॉक्टर बनून पोलिसांनी पकडली नशेच्या गोळ्या विकणारी टोळी

औरंगाबाद : डॉक्टर बनून पोलिसांनी पकडली नशेच्या गोळ्या विकणारी टोळी
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : एनडीपीएस पथक स्थापन झाल्यापासून नशेच्या पदार्थांची विक्री करणार्‍यांचे
धाबे दणाणले आहेत. सराईत गुन्हेगार प्रचंड खबरदारी घेत चोरीछुपे हा अवैध धंदा करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथकालाही आता नवनवीन शक्‍कल लढावी लागत आहे. 20 ऑगस्टला घाटीत नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या कुख्यात गुन्हेगारांना एनडीपीएस पथकाने डॉक्टर बनून अटक केली.

पथकातील अंमलदार सुरेश भिसे व महेश उगले यांनी घाटीतील ऑनड्यूटी सीएमओंचे अ‍ॅप्रॉन घालून या कारवाईला
अंजाम दिला. शेख नय्यर शेख नईम (वय 22) आणि शेख रहीम शेख महेबूब (वय 56, दोघे रा. आसिफा कॉलनी, टाऊन हॉल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील नय्यर हा नशेच्या गोळ्यांची विक्री करणारा सराईत आरोपी आहे.

पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले, घाटीतील मेडिसीन विभागाच्या पाठीमागे दर्गा भागात काही गुन्हेगार नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येतात. नशेच्या गोळ्या घेणार्‍यांनादेखील ही जागा सोयीची
वाटते. पोलिसांना या भागात कारवाई करण्यात अडचणी येतील, असा समज त्यांचा होता. दरम्यान, शनिवारी (दि.
20) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुख्यात शेख नय्यर हा नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी
येणार असल्याची खबर मिळाली. त्यावरून एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, औषधी निरीक्षक
जीवन जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक नसीम खान, अंमलदार विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्‍ता वाघमारे, दत्ता दुभळकर यांनी सापळा रचला. अटकेतील आरोपींकडून 76 गोळ्या, मोबाइल, दुचाकी, असा एक लाख तीन हजार 452 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वेशांतर करून ठेवली आरोपींवर नजर

हरेश्वर घुगे यांनी सांगितल्याप्रमाणे दर्गा परिसरात पोलिस महेश उगले, सुरेश भिसे डॉक्टरांच्या वेशात फिरत होते. यावेळी त्यांनी संशयित नय्यरवर नजर ठेवली. तो दुचाकीने आल्याची खात्री पटताच दोघे बोलत-बोलत त्याच्याजवळ
गेले. यावेळी आजूबाजूला दबा धरून बसलेल्या सहकार्‍यांना इशारा करताच त्यांनी झडप घालून दोघांनाही पकडले.

8 दिवसांनी नय्यरचे लग्न

शेख नय्यर रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. मात्र, तो अतिशय चाणाक्षपणे हा अवैध धंदा करतो. विशेष म्हणजे, तो स्वत: नशा करीत नाही. फेब—ुवारीत त्याच्याकडून 500 गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या तेव्हा तो सहा महिने जेलमध्ये होता. महिनाभरापूर्वीच तो बाहेर आला होता. लगेचच त्याने पुन्हा गोळ्यांची
विक्री सुरू केली होती. दरम्यान, आठ दिवसांवर लग्न आलेले असताना तो पुन्हा गजाआड झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news