आयुष्यावर बोलू काही’ मध्ये श्रोते मंत्रमुग्ध

आयुष्यावर बोलू काही’ मध्ये श्रोते मंत्रमुग्ध
Published on
Updated on

अक्‍कलकोट : पुढारी वृत्तसेवा : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमात अक्कलकोट शहरातील हजारो श्रोते त्यांच्या गायन कलेने मंत्रमुग्ध झाले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 35 वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे पुणे यांच्या 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाचे 6 वे पुष्प झाले.

शुक्रवार सायंकाळी 7 वाजता दीप प्रज्वलन सराफ अभिनंदन गांधी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, लाला राठोड, उत्तम गायकवाड, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, सुरेश तोरणी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान 'श्रीं'ची प्रतिमा व स्व. लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते 'श्रीं'ची प्रतिमा, कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मन नरसोबाच्या वाडीला जाई रे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!, जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही, तुझ्या माझ्या सावे गायचा पाऊसही, आग बाई आग बाय जानू विना रंग नाही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई यासह पावसाची गाणी अशा एक ना अनेक आपल्या गीतांनी दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी रसिकांची विशेष वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी के.एल.ई. संचालित मंगरुळे प्रशालेचे शिक्षक प्रशांत पाटील, राज्य विद्युत वितरण कंपनी अक्कलकोटचे अमित जाधव, एस.टी. महामंडळ अक्कलकोट आगाराचे चालक निंगबसप्पा नडगेरी यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि सहकलाकारांचा न्यासाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे विश्‍वस्त अलका भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, विश्‍वस्त संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, डॉ. राजेंद्र बंदीछोडे, प्रवीण देशमुख, ओंकारेश्‍वर उटगे, अ‍ॅड. संतोष खोबरे, योगेश पवार, राजू नवले, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, राजेंद्र पवार, प्रा. ओमप्रकाश तळेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्‍वेता हुल्ले यांनी केले. अभय खोबरे यांनी स्वागत व आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news