अक्कलकोट : ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमास नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद

हास्यसम्राट
हास्यसम्राट
Published on
Updated on

अक्कलकोट; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे प्रसिद्ध हास्यसम्राट प्रसाद खांडेकर व सहकलाकार यांच्या 'हास्यकल्लोळ' या धमाल विनोदी कार्यक्रमास नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 35 वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त बुधवारी सायंकाळी 7 वा 'हास्यकल्लोळ' सादरकर्ते प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, अमीर हर्डीकर, जयंत भालेकर आणि सहकारी मुंबई यांच्या कार्यक्रमाचे चौथे पुष्प झाले.

दीपप्रज्वलन उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अ‍ॅड. विजय हर्डीकर, एजाज मुतवल्ली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, दिलीप सिद्धे, भाऊ कापसे, दत्ता जाधव, डी.डी. ताटे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथासांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस हवालदार सुनील माने, आर.सी.राजमाने व नीता बिराजदार, संतोष वाघमारे, बालाजी खरटमल यांना सन्मानित केले. या कलाकारांनी सामाजिक व राजकीय घडामोडींवर विनोद सादर करुन 'हास्यकल्लोळ' या मनोरंजनात्मक कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलका भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, विश्वस्त संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, नंदकुमार जगदाळे, अरविंद पाटील, सत्तार शेख, अ‍ॅड. संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे, प्रवीण देशमुख, योगेश पवार आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news