उर्वशी रौतेलाची इंन्स्टाग्रामची एक पोस्ट म्हणजे ‘रोल्स रॉईस कार’ची किंमत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  सतत आपल्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे चर्चेत असते. कदाचितच ती तिच्या अभिनयाने सिनेरसिकांच्या लक्षात राहिली असेल. पण, तिने सोशल माध्यमांच्या सहाय्याने कायम प्रसिद्धी झोतात राहून विविध ब्रँडवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. जगातल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये तिची गणना केली जाते. इंन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर तिचे ६० मिलियनहून अधीक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी ती आशियातील एकमेव अभिनेत्री आहे. यामुळे ती इन्स्टाग्राम माध्यमावर एक पोस्टसाठी ती तब्बल कोट्यवधी रक्कम आकारते. त्या एका पोस्टच्या रकमेतून 'रोल्स रॉईस', पोर्चे, बेन्टली, फरारी सारख्या आलिशान कार खरेदी केली जावू शकते.

इंन्स्टाग्रामवर ६० मिलियनहून अधिक फॉलोअर्स (Urvashi Rautela)

इंन्स्टाग्रामवर ६० मिलियनहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या उर्वशी रौतेलाने याबाबती भल्याभल्यांना पिछाडीवर टाकले आहे. या यादीत बॉलिवूडचा सुलतान सलमान खान, बॉलिवूचा किंग खान अर्थात शाहरुख यासह ऋतिक रोशन, रणवीर सिंह या सारख्या आघाडीच्या पुरुष कलाकारांना देखील तिने पिछाडीवर टाकले आहे. या यादीत एम.एस.धोनी, सारख्या क्रिकेटपटूला सुद्धा मागे आहेत. त्यामुळे चित्रपटांमध्ये तिचा करिश्मा दिसला नसला तरी सोशल माध्यमांमध्ये आपला प्रभाव दाखवला आहे. या सर्वातून ती छप्पर फाडके कमाई करते.

एका इंन्स्टाग्राम पोस्टसाठी आकारते ३.५ कोटी रुपये

सध्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती ऑनलाईन उत्पादनांना प्रमोट करत पैसे मिळवत आहेत. अशा प्रकारे सोशल मीडिया हा उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कमाईचा मुख्य स्त्रोत बनला आहे. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक तिला फॉलो करतात. विराट कोहली नंतर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या यादी उर्वशीचा समावेश आहे. त्यामुळे इंन्स्टाग्रामद्वारे सर्वाधिक पैसे कमावणाऱ्यांच्या यादीत तिचा समावेश आहे. ती एका इंन्स्टाग्राम पोस्टसाठी ती तब्बल ३.५ कोटी रुपये आकारते.

एका पोस्टद्वारे खरेदी करु शकते इतक्या महागड्या कार

एका इंन्स्टाग्राम पोस्टसाठी ३.५ कोटी रुपये आकारणे म्हणजे ही खूपमोठी रक्कम आहे. या एका पोस्टच्या रकमेत रोल्स रॉईस कार खरेदी केली जावू शकते. रोल्स रॉईस घोस्ट या कारची किंमत ३ कोटी ५ लाख इतकी आहे. पण ती मिळवते त्या किंमतीत लॅन्ड रोव्हर ३ कोटी ४३ लाख ८८ हजार, लॅम्बोर्गिनी हुराकन्स ३ कोटी ४३ लाख, फरारी एफएफ ३ कोटी ४२ लाख, फरारी कॅलिफोर्निया ३ कोटी ३० लाख, बेन्टली फ्लाईंग स्पूर ३ कोटी २१ लाख, ॲस्टॉन मार्टिन ३ कोटी २० लाख, पोर्चे ९११ ची किंमत ३ कोटी इतकी आहे. म्हणजे ती एका इंन्स्टाग्राम पोस्ट द्वारे अशा आलिशान गाड्या प्रत्येक वेळी खरेदी करु शकते.

तुम्ही तिला इंन्स्टाग्रामवर फॉलो करत असला तर तुम्हाला तिच्या पोस्टवरुन समजेल की तिने तिच्या प्रत्येक पोस्टमुळे किती कमावले असेल. यामुळे चित्रपट मिळाले असो किंवा नसो अथवा ते चालो अथवा न चालो याचा तिला आता फरकच पडत नाही. केवळ सोशल मीडियात ॲक्टीव्ह असल्याकारणाने ती कोट्यवधींची मालकीन बनली आहे. तिने जे केलेलं आहे ते भल्या भल्यांना जमलेलं नाही.

उर्वशीचे आगामी प्रोजेक्टस्

आता तिच्या सध्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीमध्ये आहे. हॉलिवूड स्टार मिशेल मोरोन सोबत ती काम करत आहे. या चित्रपटाला नेटफ्लिक्स बनवत आहे. तसेच ब्लॅक रोज नावाच्या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साऊथाच सुपरहिट चित्रपट थिरुट्टू पायले २ या चित्रपटाचा सध्या हिंदी रिमेक बनत आहे. या चित्रपटात देखिल उर्वशी रौतेला आपणास दिसणार आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news