Attack On Mosque In Gurugram : गुरुग्राम येथे मशीदीमध्ये नमाज पठण करणाऱ्यांवर जमावाचा हल्ला | पुढारी

Attack On Mosque In Gurugram : गुरुग्राम येथे मशीदीमध्ये नमाज पठण करणाऱ्यांवर जमावाचा हल्ला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : हरियाणा येथील गुरुग्राम येथे मशीदमध्ये नमाज पठण करणाऱ्यांवर जमावाने हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात नमाज पठण करणाऱ्या लोकांना मारहाण करत जमावाकडून त्यांना धमकावण्यात आले. दरम्यान, जमावाने बाहेर पडताना मशीदीचे गेट बंद करत त्याला कुलूप ठोकले. या बाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून दहा ते बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Attack On Mosque In Gurugram)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. १२) सायंकाळी येथील भोरा कलान परिसरातील मशीदीमध्ये नमाज पठण सुरु होते. यावेळी एक जमाव मशीदीमध्ये शिरला आणि नमाज पठण करत असलेल्या लोकांना मारहाण सुरु केली. तसेच यावेळी त्यांना ‘हा भाग सोडून जा’ म्हणून धमकाविण्यात आले आहे. मारहाण करुन या जमावाने बाहेर येत मशीदीचा गेटला कुलूप लावले व पळून गेले. या वेळी त्यांनी मशीदीची देखील तोडफोड केल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून कारवाई सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Attack On Mosque In Gurugram)

सुबेदार नजर अहमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिलासपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अहमद यांच्या तक्रारीनुसार भोरा कलान या भागात फक्त चार मुस्लीम कुटुंबे राहतात. यावेळी त्यांच्या अन्या काही लोक नमाज पठण करत होते. तेव्हा काही लोकांनी येऊन त्यांना मारहाण केली, तसेच या भागातून मुस्लीमांना निघून जावे अशा पद्धतीने धमकावण्यात आले. या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Attack On Mosque In Gurugram)

संबंधित बातम्या

पोलिसांनी सांगितले की या बाबतचा तपास सुरु आहे. पण, याबाबत अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी तिघा संशियांताना ताब्यात घेतले असून त्यांची ओळख देखिल पटली आहे. राजेश चौहान, अनिल भदोरिया आणि संजय व्यास यांची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या शिवाय आणखी सात ते आठ लोकांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button