

न्यायालयात येणार्यांसाठी पुरेसे पार्किंग असणे आवश्यक आहे. पार्किंगअभावी न्यायालयासह परिसरातही वाहतूक कोंडी होत आहे. पार्किंगची व्यवस्था केल्यास न्यायालय आवारासह परिसरात होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. वाहनाच्या वर्दळीमुळे धुळीच्या त्रासाचाही मोठा सामना करावा लागत आहे.– अॅड. धैर्यशील पाटील,फौजदारी वकील.न्यायालयातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊनही प्रशासनामार्फत दखल घेतली जात नाही. विकासाची कामे होत असली तरी पायाभूत सुविधाही पुरविण्याकडे लक्ष हवे. भविष्याचे आश्वासन दाखवून सध्या आहे त्याच परिस्थितीत दिवस काढायला लावणे ही प्रशासनाची भूमिका स्वीकारार्ह नाही. पुणे बार असोसिएशनही या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही.– अॅड. राशीद सिद्दिकी,फौजदारी वकील.
हेही वाचा