सेलु, पुढारी वृत्तसेवा : हिस्सी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या जयश्री दीपक गोरे विजयी झाल्या. त्यांचा ३०८ मताधिक्याने दणदणीत विजय झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे ९ पैकी ७ उमेदवार निवडून आले. सरपंचपदाच्या उमेदवार जयश्री गोरे यांना एकूण ८०५ मते मिळाली. Gram Panchayat Election Results
सदस्य पदासाठी, गोरे अर्चना धोंडीराम (२६२ ), मगर संपत रामभाऊ (२०४) , गोरे अहिल्या साळकीराम (२३६) ,कवडे सुदमाती भीमराव (१९३), शिंदे माणिक रामा (२७६), मगर सुदाम यादवराव (२८८), साळवे सुनीता धम्मपाल यांना २९० मते पडली. Gram Panchayat Election Results
बालासाहेब मगर, रघुनाथ मगर, नारायण बोरकर, गणेश बोरकर, मधुकर कवडे, विठ्ठल गात, भास्कर गात, सुभाष शिंदे, दत्ता आल्से, संतोष गात, बालासाहेब गात, आदींनी पुढाकार घेऊन विजय मिळवला. असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष दत्ताराव कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तालुक्यातील चिकलठाणा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाच्या शोभा पांडुरंग बुधवंत सदस्यपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयासाठी दत्ताराव जाधव, प्रशांत नाईक, नारायण जाधव, विकास नाईक, अनिल कांगणे, जीवन महाजन, गणेश काटकर, आदींनी पुढाकार घेतला.
हेही वाचा