उत्पादन खर्च कमी करून इ मार्केटिंग वर भर दयावा : नितीन गडकरी

उत्पादन खर्च कमी करून इ मार्केटिंग वर भर दयावा : नितीन गडकरी
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा संकल्प आहे की, 2030 पर्यंत संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची ओळख एकसमान सोर्सिंग हब म्हणून करायची आहे. यामूळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी याचा फायदा होईल.
2019 नंतर 2 वर्ष कोविडमुळे गणवेश क्षेत्रात मोठी मंदी आली होती. परंतु आता 2022 मध्ये कोविडचे प्रमाण कमी झाल्याने सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने हे लक्षात घेऊन हैदराबादमध्ये पाचव्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

या प्रदर्शनाला प्रथमच ३० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय देश म्हणजे जगातील १२% देश उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या प्रदर्शनाच्या ब्रँडिंगसाठी रविवारी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा टीझर लॉन्च करण्यात आला.

यावेळी सोलापूर गारमेंट असोसिएशनचे संचालक अमित जैन म्‍हणाले, या प्रदर्शनात संपूर्ण भारतातून 250 हून अधिक गणवेश उत्पादक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांचे मनोबल खूप वाढेल. या प्रदर्शनाला मोठ्या ब्रँडिंगची आवश्यकता असेल. या कामगिरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग होईल आणि सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होईल अशी आशा जैन म्‍हणाले.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, गारमेंट उत्पादनासाठी लागणारे कच्चा माल सोलापूरातच उत्पादन करावे. तसेच कापड देखील सोलापूरमधूनच तयार करावे जेणेकरून इथे रोजगार उपलब्ध होईल आणि युनिफॉर्मचे उत्पादन खर्च कमी होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहू, त्याचप्रमाणे सोलापूर गारमेंटच्या उत्पादनांची इ मार्केटिंग करावे एका क्लिकवरून सोलापूरच्या उत्पादनांची माहिती जगभरात पोहोचले असे गडकरी म्हणाले.

उत्पादन घेताना नेहमी नवीन प्रकारचे प्रोडक्ट घेण्यावर भर दयावे. यासाठी एक डीझाइन सेंटर सुरू करावे असा सल्लाही दिला. आणि सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ एखादी जागा मिळाल्यास तिथे वेअर हाऊस तयार करून तेथूनच एक्स्पोर्ट करता येईल त्यामुळे तुमचा वाहतूक खर्च वाचेल यासाठी प्रयत्न करावे असेही गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी यांनी केले आवाहन

हैद्राबाद येथे नोव्हेंबर 2022 साली होणाऱ्या 5 व्या गारमेंट प्रदर्शनात देशभरातील गारमेंट उत्पादकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष सतीश पवार, राजू कोचर, अमित जैन, प्रकाश पवार, अजय रंगरेज यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news