नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवजयंतीनिमित्त शहरातील 290 सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. बॅनर तपासून पोलिसांनी परवानगी दिली असून, विनापरवानगी सोहळा साजरा करणार्‍यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेअंतर्गत एक खिडकी योजनेत जयंतीच्या पूर्वसंध्येपर्यंत मंडळांचे अर्ज दाखल होत होते.दाच्या शिवजयंतीवर कोरोनासंदर्भातील निर्बंध नसल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीसह राजकीय गट-तटांमुळे शिवजन्मोत्सवाच्या सोहळा अधिक जल्लोषात होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांनी मंडप, देखावे उभारले आहेत.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकमध्ये एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, 14 पोलिस निरीक्षक, 46 उपनिरीक्षक, 475 पुरूष आणि 105 महिला कर्मचार्‍यांसह 100 होमगार्डचे जवान राहणार आहेत. तर परिमंडळ दोन मध्ये एक पोलिस उपआयुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, 10 पोलिस निरीक्षक, 33 उपनिरीक्षक, 385 पुरुष आणि 75 महिला कर्मचारी, 185 पुरुष आणि 65 महिला होमगार्डचे जवान आहेत. त्याचप्रमाणे एसआरपीएफ, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक, वाहतूक शाखेसह सर्व गुन्हे शाखेची पथके बंदाबेस्तात सहभागी होणार आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रथमच संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकूण 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे पोलिस प्रशासनाकडून मिरवणुकीत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग असा…
दुपारी 4 वाजता वाकडी बारव येथून मिरवणूक सुरु होणार असून महात्मा फुले मार्केट, दुध बाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक मार्गे रामकुंड या मार्गावरुन मिरवणूक जाईल.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news