बाप्पांचे आवडते मोदक आरोग्यासाठीही गुणकारी

बाप्पांचे आवडते मोदक आरोग्यासाठीही गुणकारी

नवी दिल्ली : सध्या देशभर गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. मोदक केवळ चवीसाठीच चांगले असतात असे नाही; तर त्यांच्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणही असतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

मोदकामध्ये तूप, खोबरे, गूळ, सुका मेवा, तांदूळ इत्यादी अनेक आरोग्यदायी घटक असतात. मोदक साखरेऐवजी गुळाने तयार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गूळ-खोबर्‍याचे सारण असलेल्या मोदकामध्ये फायबर असते, तसेच तुपामुळे बद्धकोष्ठता दूर होते. मोदकाच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. वाफेवर शिजवलेल्या मोदकाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुपात आढळणारे ब्युटीरिक अ‍ॅसिड सांध्यातील जळजळ कमी करण्यास उपयुक्त आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news