लोकसभा निवडणूक 2024 : नाशिककर मतदानासाठी सज्ज

लोकसभा निवडणूक 2024 : नाशिककर मतदानासाठी सज्ज
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  – अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान घेण्यात येत आहे. १८ व्या लोकसभेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधी पाठविण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.

इंदिरानगर भागातील मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासूनच मोठ्या प्रमाणात मतदारांनी स्वयंस्फूर्त मोठ्या रांगा लावल्या आहेत सकाळी सात वाजेपासून मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर प्रथम मतदान करणारे तरुण व वयस्कर तसेच अनेकांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात लाईन लावलेल्या आहेत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच उन्हाची तीव्रता वाढल्याचा अनुमान असल्याकारणाने या ठिकाणी मांडव टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नांदगाव तालुक्यात सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. मतदान केंद्र बाहेर मतदारांच्या रांगा
नांदगाव तालुक्यात सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. मतदान केंद्र बाहेर मतदारांच्या रांगा

लोकसभेच्या पाचव्या व राज्यातील शेवटच्या टप्प्यामध्ये १३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघांतून एकूण ४१ उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

इंदिरानगर : जीवत इंदानी अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा त्यांनी आपला मतदानाचा कर्तव्याचा बजवण्यासाठी डे केअर शाळेत येथे ॲम्बुलन्स मधून येत मतदान केले त्यांचे वय वर्ष 88 असून मतदानाचे कर्तव्य त्यांनी आजारपणात सुद्धा मतदान केल्याने उपस्थितीत मतदारांनी त्यांचे कौतुक केले
इंदिरानगर : जीवत इंदानी अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा त्यांनी आपला मतदानाचा कर्तव्याचा बजवण्यासाठी डे केअर शाळेत येथे ॲम्बुलन्स मधून येत मतदान केले त्यांचे वय वर्ष 88 असून मतदानाचे कर्तव्य त्यांनी आजारपणात सुद्धा मतदान केल्याने उपस्थितीत मतदारांनी त्यांचे कौतुक केले

निरीक्षकांकडून पाहणी
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (जनरल) यांनी शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांच्या स्ट्राँग रूमला भेटी दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट, मतदान साहित्य वाटपाची निरीक्षकांनी पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा हेदेखील या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

वाहनांवर जीपीएस 
अधिकारी व कर्मचारी तसेच ईव्हीएमच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाने १ हजार २५२ वाहनांची मदत घेतली जात आहे. त्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस, मिनी बसेस, जीप, कार व ट्रक्सचा समावेश आहे. या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे स्ट्राँग रूम ते मतदान केंद्र या दरम्यान सदर वाहनांचे ट्रॅकिंग करणे प्रशासनाला अधिक सोयीचे होणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ
विधानसभा              मतदार             मतदान केंद्र
सिन्नर-                     306533             – 321
नाशिक पूर्व-              388485-              326
नाशिक मध्य-              328054-              295
नाशिक पश्चिम-          456096-              410
देवळाली-                  276902-              269
इगतपुरी-                274054-              289
एकूण-                  2030124-              1910

दिंडाेरी लोकसभा मतदारसंघ
विधानसभा           मतदार       मतदान केंद्र
नांदगाव             332512-       331
कळवण-          294003-       345
चांदवड-         299304-          296
येवला-            314551-         320
निफाड-         291459-         273
दिंडोरी-         321558-           357
एकूण-          1853387-         1922

मतदान केंद्र
नाशिक : 1910
दिंडोरी : 1922

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट
मतदारसंघ- बॅलेट युनिट- कंट्रोल युनिट- व्हीव्हीपॅट
नाशिक- 4480- 2290- 2480
दिंडोरी- 2305- 2305- 2496

संवेदनशील केंद्र : ६
नाशिक : वाढण (ता. त्र्यंबक), बोरटेंभे (ता. इगतपुरी)
दिंडोरी : अलंगुण (१०० व १०१), मालगव्हाण (ता. कळवण), येवला

सूक्ष्म निरीक्षक तैनात
नाशिक : २४०
दिंडोरी : १३०

मतदानासाठी १३ पुरावे ग्राह्य
-मतदान कार्ड
-आधार कार्ड
-पॅन कार्ड
-दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र
-कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
-वाहनचालक परवाना
-पासपोर्ट
-निवृत्तिवेतन दस्तऐवज
-मनरेगा रोजगार ओळखपत्र
-शासन, सार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना
वितरित छायाचित्र असलेले पासबुक
-राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्टकार्ड
-बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक
-संसद/विधानसभा/विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news