महिलांना चाळीशीतच येतेय रजोनिवृत्ती, 0.5 टक्के असलेले प्रमाण आता 2 टक्क्यांवर

महिलांना चाळीशीतच येतेय रजोनिवृत्ती, 0.5 टक्के असलेले प्रमाण आता 2 टक्क्यांवर
Published on
Updated on

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे (मेनोपॉज) वय पूर्वी 50 ते 55 होते. आता ते 40 ते 50 वर आले आहे. त्याआधी सर्वसाधारणपणे वर्षभर रजोनिवृत्तीपूर्व (पेरी मेनोपॉज पीरियड) मध्ये महिलांना विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी अगदी 0.5 टक्के असलेले हे प्रमाण आता सुमारे 2 टक्क्यांवर गेले आहे.

कमी वयात मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले

पूर्वी मुलींना मासिक पाळी वयाच्या 14 ते 15 व्या वर्षी यायची. आता वयाच्या सातव्या त्या आठव्या वर्षीच येत आहे. तर 40 ते 50 वयाच्या कार्यकाळात पाळी बंद होत आहे. मासिक पाळी बंद होण्याच्या टप्प्यात म्हणजेच रजोनिवृत्तीपूर्व काळात स्त्रियांमध्ये विविध लक्षणे दिसतात. त्याला पेरी मेनोपॉज म्हणतात. पेरी मेनोपॉजमध्ये वर्षभर साधारण पंधरा दिवसांनी पाळी येते. चार महिन्यांनी ब्लिडिंगचा त्रास होऊ शकतो. वर्षभर पाळी न आल्यास पाळी बंद झाली असे मानले जाते.

रजोनिवृत्ती हा आजार नाही.

रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच तो भाग आहे. पाळी बंद होण्यापूर्वी स्त्रियांच्या शरीरात काही बदल घडू लागतात. रजोनिवृत्तीपूर्व काळात पेरी मेनोपॉज पीरियडची लक्षणे दिसताच काळजी घेतल्यास रजोनिवृत्ती सुखकारक होऊ शकते, असे स्त्री रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पेरी मेनोपॉजची लक्षणे

मासिक पाळीच्या चक्रात बदल, पाळी महिन्याच्या महिन्याला येते, पण रक्तस्त्राव कमी अथवा जास्त होतो, कंबरदुखी, पाठदुखी, चिडचिडेपणा, सहनशीलता कमी होणे, घाम येणे, डोकेदुखी, झोप न लागणे, अंगात उष्णता वाढल्यासारखे वाढणे, चेहर्‍यावर लव येणे, केस पातळ होणे, वजन वाढणे यासारखी लक्षणे दिसतात.

रजोनिवृत्ती सुखकारक होण्यासाठी रजोनिवृत्तीपूर्व काळात काळजी घेणे गरजेचे आहे. मेनोपॉजपूर्वी पेरी मेनोपॉजस्थिती येते, तेव्हा आहारात प्रोटीन, सोयाबीन, फ्रुट, व्हेजिटेबल असायला हवे. वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम, याबाबी गरजेच्या आहेत. वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मसालेदार पदार्थ, धूम्रपान, मद्यपान टाळावे. प्याप्समेयर, मॅमोग्राफी करून घ्यावी. आता सेल्फ ब्रेस्ट एक्झाम संकल्पना आली आहे. महिलांनी स्वतःच आपले ब्रेस्ट नियमित तपासले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजच्या कामातून थोडा वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी ठेवायला हवा.
– डॉ. सुजाता गायकवाड, स्त्रीरोगतज्ज्ञ भोसरी रुग्णालय, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news