Lok Sabha election result : शेअर बाजारात घसरण : गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आज लोकसभा निवडणुकीच्‍या मतमोजणीचे पडसाद शेअर बाजारावर उमटले. एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा निवडणुकीचे प्राथमिक कल वेगळा असल्‍याचे दिसत आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी अधिक चुरशीची झाल्याने व्यापाराच्या पहिल्या 20 मिनिटांत भारतीय शेअर बाजारातील तीव्र विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे मोठ नुकसान झाले.

गुंतवणूकदारांच्‍या संपत्तीत 20 लाख कोटींची घट

आज ट्रेडिंगच्या पहिल्या 20 मिनिटांत त्यांची संपत्ती सुमारे २० लाख कोटी रुपयांची घट झाली. वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (mcap) बीएसई मंगळवारी सकाळी 9:35 च्या सुमारास सुमारे 406 लाख कोटींवर घसरले. मागील सत्राच्या समाप्तीच्या सुमारे ही आकडेवारी 426 लाख कोटी रुपये इतकी होती. बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी 50 प्रत्येकी 4 टक्क्यांनी घसरले, तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांना मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात 5 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले.

मतमाेजणीत 'चढ-उतार', शेअर मार्केटमध्‍ये घसरगुंडी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अटीतटीची लढत दिसत आहे. याचे परिणाम शेअर बाजारावर उमटले. आज सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली होती. व्यवहाराच्या सुरुवातीला तो 183 अंकांच्या घसरणीसह उघडला. लगेचच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला आणि 74,753 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीही 84 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि 539 अंकांपेक्षा अधिक घसरून 22,724.80 वर आला आहे. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी इंडिया VIX २६ वर हाेता.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ४ जून) सकाळी आठला प्रारंभ झाला . सुरुवातीच्‍या मतमोजणी भाजप प्रणित एनडीएने निर्णायक आघाडी घेतली हाेती. मात्र नंतर इंडिया आघाडीनेही जाेरदाक कमबॅक केले. सुरुवातीच्‍या मतमाेजणीत एनडीए पिछाडीवर गेले आणि याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. व्यवहाराच्या सुरुवातीला तो 183 अंकांच्या घसरणीसह उघडला. लगेचच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला आणि 74,753 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीही 84 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि 539 अंकांपेक्षा अधिक घसरून 22,724.80 वर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news