‘या’ देशात माणसांपेक्षा पाचपट अधिक मेंढ्या!

‘या’ देशात माणसांपेक्षा पाचपट अधिक मेंढ्या!

वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये माणसांच्या तुलनेत मेंढ्यांची संख्या पाचपट अधिक झाली आहे. नुकतीच याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली. सन 1850 च्या दशकापासून प्रथमच मेंढ्या लोकांपेक्षा अधिक झाल्या आहेत. याबाबतीत 170 वर्षांचा विक्रम मोडला आहे!

सांख्यिकी न्यूझीलंडचे विश्लेषक जेसन अ‍ॅटवेल यांनी सांगितले की 1850 च्या दशकानंतर प्रथमच या देशात मेंढ्यांच्या तुलनेत लोकांची संख्या पाचपटीने कमी झालेली आहे. 1982 मध्ये न्यूझीलंडमधील मेंढ्यांची संख्या प्रतिव्यक्ती 22 मेंढ्या अशा अनुपातामध्ये होती. ऑस्ट्रेलियात न्यूझीलंडच्या तुलनेत तिप्पटीने अधिक मेंढ्या आहेत हे विशेष. मात्र, तेथील अनुपात प्रत्येक व्यक्तीमागे तीन मेंढ्या इतकेच आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या 5.2 दशलक्ष इतकी आहे. या देशात मेंढ्यांची संख्या अधिक असल्याने तो जगातील सर्वात मोठ्या लोकर निर्यातक देशांपैकी एक आहे. गेल्यावर्षी न्यूझीलंडने 28.4 कोटी डॉलर्स किमतीच्या लोकरीची निर्यात केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news