पुढारी ऑनलाईन: व्हॅलेंटाईन डे हा जगभरात सर्वत्र प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू देण्याची आणि डेटवर घेऊन जाण्याची प्रथा आपल्याला माहीतच आहे. या दिवशी भारतात अनेक वाद विवाद होतात, ज्याला आपण आपल्या देशात एक वीयर्ड ट्रॅडीशन मानतो.
पण तुम्हाला माहित आहे का? की जगभरात व्हॅलेंटाईन डेशी संबंधित प्रथा काय आहेत? आणि या दिवशी वेगवेगळ्या देशांमध्ये काय केले जाते? चला, तर मग आज आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या अशा विचित्र प्रथांविषयी माहिती देत आहोत, ज्याबद्दल तुम्ही या आधी कधीही ऐकले नसेल.
1. घाना
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चॉकलेटप्रेमींसाठी हा आफ्रिकन देश स्वर्गापेक्षा कमी नाही. चॉकलेट उत्पादनात घाना हा अव्वल आहे. येथे जोडीदाराला भरपूर चॉकलेट देण्याची प्रथा आहे. तसेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कस्टम मेड चॉकलेट्स देखील बनवल्या जातात. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे ऐवजी या देशात राष्ट्रीय चॉकलेट डे साजरा केला जातो. तुम्हाला अंदाजही येणार नाही, पण इथे व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर जोडीदाराला अनेक किलोंचे चॉकलेट्स दिले जातात.
2. जपान
व्हॅलेंटाईन डे हा जपानमध्ये जगापेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील पुरुष आपली मैत्रीण किंवा पत्नीला भेटवस्तू देतात. पण जपानमध्ये गर्लफ्रेंड आणि पत्नी त्यांच्या जोडीदारांना चॉकलेटने सजवलेल्या भेटवस्तू देतात. हे असं केलं जातं कारण महिलांना स्वतःलाही चॉकलेट गिफ्ट मिळू शकेल.
3. दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियामध्ये ही प्रथा केवळ जोडप्यांसाठीच नाही तर अविवाहितांसाठीही आहे. दक्षिण कोरियामध्ये प्रत्येक महिन्याची 14 तारीख वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. तेथे 14 फेब्रुवारीला भेटवस्तू, चॉकलेट्स, फुले इत्यादी गोष्टी दिल्या जातात आणि त्यानंतर 14 मार्चला विशेष दिवस साजरा केला जातो. तथापि, 14 एप्रिल रोजी 'ब्लॅक डे' देखील साजरा केला जातो, ज्यामध्ये अविवाहित लोक त्यांचे स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी ब्लैक सेसमे नूडल्स खातात.
4. फिलीपिन्स
फिलीपिन्समध्ये, प्रेम आणि अभिव्यक्तीचा हा दिवस जरा जास्तच खास बनवला जातो. या दिवशी तेथे सामूहिक विवाह होतात. उद्यानांपासून ते शॉपिंग मॉल्सपर्यंत सर्व काही फुलले असते. बरेच लोक त्यांच्या जोडीदाराशी पुन्हा लग्नही करतात. हे सर्व पब्लिक सर्व्हिसच्या नावाखाली स्पॉन्सर देखील केले जाते.
5. इंग्लंड
शतकानुशतके इंग्लंडमध्ये ही प्रथा सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या रात्री ती तिच्या उशीजवळ तमालपत्र ठेवते. येथे असे मानले जाते की, तमालपत्रामुळे केवळ चांगली झोप घेण्यास मदत होत नाही, तर महिला तिच्या स्वप्नात तिच्या भावी पतीचा चेहरा देखील पाहू शकते. असे असले तरी आता ही प्रथा काही दुर्गम भागातच घडतात.
6. फिनलंड
प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, परंतु फिनलंडमध्ये हा दिवस आपल्या जिवलग मित्रासोबत साजरा करण्याचा दिवस आहे. या देशात हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो.
यापैकी कोणत्या प्रथा तुम्हाला आधीच माहित होत्या? तुमचे उत्तर आम्हाला आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर कळवू शकता.तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की शेअर करा. अशा आणखी स्टोरी वाचण्यासाठी पुढारीशी कनेक्ट रहा.