Mahila Melava Meeting Dhule | राहुल गांधी यांचे महिलांना मार्गदर्शन | पुढारी

Mahila Melava Meeting Dhule | राहुल गांधी यांचे महिलांना मार्गदर्शन

धुळे : ऑनलाईन डेस्क

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यात होत असून महिला न्याय हक्क परिषदेचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राहुल गांधी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

धुळे जिल्ह्यात राहुल गांधी यांची यात्रा दोंडाईचा इथे मुक्कामी असून त्यांच्या उपस्थितीत धुळ्यात रोड शो, चौक सभा आणि महिला हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आल्याने यामध्ये त्यांनी महिलांना आर्थिक, शैक्षणिक आणि महिलांच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले. महिलांची भागीदारी ५० टक्के असून काही सरकारी योजनांमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक वर्षी एक लाख रुपये जमा होण्याची सरकारची ऐतिहासिक घोषणेचे त्यांनी कौतुक केले. करोडो महिलांना याचा लाभ होणार असून हा एक क्रांतीकारी विचार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. उद्योजकांना जर आर्थिक मदत मिळत असेल तर महिलांना नक्कीच आर्थिक लाभ हा मिळायलाच हवा असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महिलांसाठी सावित्रीबाई फुले महिला वसतीगृह उभारण्यात येण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि अश्‍विनी कुणाल पाटील यांनी या महिला परिषदेची तयारी करुन घेतली होती.

 

Back to top button