Rahul Gandhi : ‘जियो और आप लोग मरो’… काय म्हणाले राहुल गांधी | पुढारी

Rahul Gandhi : 'जियो और आप लोग मरो'... काय म्हणाले राहुल गांधी

धुळे : ऑनलाईन डेस्क

भारत जोडो न्याय यात्रेसाठी खासदार राहुल गांधी यांचे धुळे येथे आगमन झालेले असून त्यांचा (Rahul Gandhi) दोंडाईचा पासून धुळे पर्यंत भव्यदिव्य रोड शो करण्यात येत आहे. त्यानंतर राहुल गांधी जनतेसोबत संवाद साधण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. यामध्ये त्यांनी नागरिकांशी मुक्तसंवाद साधला.

Rahul Gandhi : दोंडाईचा पासून धुळे पर्यंत रोड शो
देशात सगळीकडे महागाई, बेरोजगारी, संपूर्ण खासगीकरण सुरु असून पंतप्रधान आणि उद्योजकांच्या मिलीभगतमुळे सामान्य लोकांचे मोठे नुकसान होत आहे. दिल्ली सरकार ९० टक्के लोक चालवतात. शिक्षणावर किती पैसा खर्च करायचा हे सुध्दा ते लोक ठरवतात. बजेटमध्ये १०० रुपये खर्च झाला तर फक्त आदिवासींना त्यातील १० पैसे मिळतो. सरकार तुमच्या खिशातील पैसा काढून घेतो आणि तुम्हाला कळत देखील नाही. सगळीकडे खासगीकरण सुरु असून पैसा तुमचा असून तुम्ही केवळ हातावर हात धरुन बघत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. संतोष पाटील या नागरिकाला थेट वाहनावर उभे करुन त्यांनी सर्वसामान्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे उदाहरण दिले की, सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करुन कशाप्रकारे पंतप्रधान, उद्योजक हे त्यांचा खिसा कापत आहेत. सोशल मिडीयाचा वापर वाढत असून ‘जियो और आप लोग मरो’ असा संदेश त्यांनी देऊन सांगितले की, मोबाईलवरचा वाढता उपयोग हा उद्योजकांचा पैसा वाढवणे आहे. जनता प्रश्न विचारत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे फावत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

Back to top button