चाळीसगाव मध्ये ११ किलो गांजासह रोख रक्कम जप्त; तिघांवर गुन्हा | पुढारी

चाळीसगाव मध्ये ११ किलो गांजासह रोख रक्कम जप्त; तिघांवर गुन्हा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव शहरातील घाटरोड कोळीवाडा भागात राहत्या घरात शहर पोलिसांनी आज दुपारी टाकलेल्या छाप्यात सुमारे 1 लाख 66 हजार 620 रूपये किंमतीचा 11 किलो 214 ग्रॅम गांजा व रोख 58 हजार 370 रूपये असा एकूण 2 लाख 25 हजार 825 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील घाटरोड, कोळीवाडा भागात गांजाविक्री होत असल्याची माहिती पालिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक  के. के. पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. 27) दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास घाटरोड कोळीवाडा भागातील संशयित आरोपीतांच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी सुमारे 1 लाख 66 हजार 620 रूपये किंमतीचा प्लास्टीक गोणीतील एकुण 11 किलो 214 ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा, उग्रवास असलेला गांजा, 58 हजार 770 रूपयांची रोकड, 200 रूपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा ईलेक्ट्रीक वजन काटा, 230रूपये किंमतीचे प्लास्टीकचे पाऊच असा सुमारे 2 लाख 2 हजार 855 रूपयांचा साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेसह फरार असलेल्या अजय उर्फ राकेश भिकन चौधरी या दोघांच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सहा. पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करीत आहेत.

Back to top button