Shreyas Iyer Ranji : ‘बीसीसीआय’च्या कारवाईनंतर श्रेयस अय्यरला सुचले शहाणपण, खेळणार रणजी सेमीफायनल | पुढारी

Shreyas Iyer Ranji : 'बीसीसीआय'च्या कारवाईनंतर श्रेयस अय्यरला सुचले शहाणपण, खेळणार रणजी सेमीफायनल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer Ranji : ‘बीसीसीआय’ने केंद्रीय करारातून डच्चू दिल्यानंतर अजिंक्य रहाणेला शहाणपण सुचले असून तो रणजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. शनिवारपासून सुरू होणा-या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करेल. तामिळनाडू विरुद्ध तो कसे प्रदर्शन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर रणजीच्या या मोसमात मुंबईकडून खेळला होता. यानंतर तो कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघात सामील झाला आणि त्यानंतर इंग्लिश संघाविरुद्ध पहिले दोन कसोटी सामने खेळले. या सामन्यांत त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. त्यातच त्याला दुसऱ्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे अय्यरला संघातून वगळण्यात आले. दरम्यान,

दरम्यान, जे खेळाडू राष्ट्रीय संघाचा भाग नाहीत त्यांना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळाव्या लागतील, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बजावले. मात्र श्रेयसने आपण दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकणार नसल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर नॅशनल क्रिकेट अकादमीने बीसीसीआयला मेल करून श्रेयसला दुखापतीची समस्या होती पण तो आता पूर्णपणे बरा झाला आहे, असे कळवले. ज्यामुळे श्रेयसचा खोटेपणा उघड झाला. यानंतर काही दिवसांनी बीसीसीआयने कठोर निर्णय घेत त्याला वार्षिक करारातून वगळले.

Back to top button