वेंगुर्लेत आढळला अतिदुर्मीळ निळा ‘कॅस्ट्रो कोरल स्नेक’ | पुढारी

वेंगुर्लेत आढळला अतिदुर्मीळ निळा ‘कॅस्ट्रो कोरल स्नेक’

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ‘कॅस्ट्रो कोरल स्नेक’ (पोवळा साप) ही अतिशय दुर्मीळ समजली जाणारी निळ्या रंगाच्या सापाची प्रजाती वेंगुर्ले तालुक्यातील तुळस-राऊळवाडा येथे आढळून आली आहे. हा साप जहाल विषारी आहे.

वेंगुर्ले येथील प्राणिमित्र महेश राऊळ यांना हा साप आढळून आला. सिंधुदुर्गमध्ये दुसर्‍यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांनी सांगितले. हेमंत ओगले यांनी या सापाचे संशोधन केले आहे. विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा द़ृष्टीस पडत नाही.वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटाखालून पूर्णपणे नारंगी असतो

दगडाखाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी वास्तव्य करतोे. या सापाची लांबी साधारणपणे दोन ते अडीच फुटांपर्यंत असते. तो करंगळीएवढा जाड असतो. त्याच्या डोक्यावर नारंगी जाड रेषा असते. जर हा साप घाबरला, तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्याजवळ येऊ नका, असा इशारा देत असतो.

 

Back to top button