National Stock Exchange : नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर्फे स्टॉक एक्सचेंज क्षेत्रातील भारतातील पहिले लिस्टिंग साजरे | पुढारी

National Stock Exchange : नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर्फे स्टॉक एक्सचेंज क्षेत्रातील भारतातील पहिले लिस्टिंग साजरे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : इंडियन सोशल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई एसएसई) नॅशनल स्टॉक एक्सचेंजने १३ डिसेंबर २०२३ रोजी एसजीबीएस उन्नती फाउंडेशनची देशातील पहिली नोंदणी (लिस्टिंग) साजरी केली. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मुंबई येथे एनएसई मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर, रेग्युलेटर्स आणि मीडिया हाउसेस यांनी हजेरी लावली होती. पहिल्या लिस्टिंगमध्ये अंदाजे १.८ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला असून त्यामुळे एसजीबीएस उन्नती फाउंडेशाला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळ नाडू अशा विविध राज्यांतील सरकारी कॉलेजेसमध्ये अंतिम वर्षांत शिकणाऱ्या १०,००० तरुणांना प्रशिक्षण देणं शक्य होईल. (National Stock Exchange)

सेबीचे पूर्ण वेळ सदस्य श्री. अश्वानी भाटिया म्हणाले, ‘नवीन प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग अनुभवण्याचा हा क्षण आपल्या देशासाठी अविस्मरणीय असून त्यामुळे ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या एनजीओजसह सामाजिक उद्योगांना चांगल्या कामासाठी निधी उभारणे किंवा भांडवल मिळवणे शक्य होईल. सोशल स्टॉक एक्सचेंज किंवा एसएसई ही भारत सरकारचा क्रांतीकारी उपक्रम २०१९ च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला होता. सामाजिक सर्जनशीलता, सर्वसमावेशकता आणि परिणाम साधणाऱ्या यंत्रणेला चालना देण्याच्या ध्येयासह या एक्सचेंजची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात तयार करण्यात आल्याप्रमाणे एसएसईचे जगभरात कुठेही समांतर स्वरुप नाहीये आणि म्हणूनच समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या सामाजिक संस्था ओळखून, त्यांचे मूल्याकंन करून, पाठिंबा देण्यासाठी गुंतवणुकदारांना पारदर्शक व विश्वासार्ह यंत्रणा मिळेल.’ (National Stock Exchange)

सेबी, सोशल स्टॉक एक्सचेंज अडव्हायजरी कमिटीचे अध्यक्ष डॉ. आर. बालासुब्रमण्यम म्हणाले, ‘आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे, कारण त्यामागे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सतत कमी, अपुऱ्या निधीमध्ये काम करणाऱ्या संस्थांना मिळणार असलेला दिलासा आहे. यामुळे देशातील सामाजिक परिस्थितीमध्ये बदल होऊन या आशेसह यात सहभागी होणं अभिमानास्पद आणि सन्माननीय आहे. भारतातील एसएसई जागतिक मापदंड ठरेल याची एकत्रित जबाबदारी आपल्यावर आहे.’ क्षमता विकसित करणे हे केवळ एनपीओजसाठी गरजेचे नाही, तर रेग्युलेटर्स आणि एक्सचेंजेससाठीही आवश्यक आहे व त्यांनी सामाजिक क्षेत्र समजून घेतले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. (National Stock Exchange)

एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, ‘एएसईवर नोंदणी करण्यात आलेल्या कंपन्यांनी गेल्या तीन दशकांत सामान्य माणसाच्या सहभागातून संपत्ती निर्मिती, रोजगार निर्मिती आणि एकंदर आर्थिक विकास केला आहे. सोशल स्टॉक एक्सचेंजच्या नोंदणीसह हा परिणाम कित्येक पटींनी वाढेल. या फ्रेमवर्कमध्ये पारदर्शकता, विश्वास, कार्यक्षमता, खर्चात बचत, परिणामांचे मोजमाप आणि निष्कर्षांवर आधारित समाजसेवा अशा विविध लाभांचा समावेश आहे. कॉर्पोरेट यश आणि सामाजिक परिणाम असे दुहेरी ध्येय साध्य करत एसएसईने समाजसेवक, गुंतवणूकदार, दाते आणि एनपीओजना एकत्र येण्यासाठी जागा तयार केली आहे असून तिथे त्यांना एकत्रितपणे अधिक समान व शाश्वत भविष्यासाठी योगदान देता येईल.’ त्यांनी सोशल स्टॉक एक्सचेंज फ्रेमवर्क भारतात लाँच करण्यात सेबीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. (National Stock Exchange)

याप्रसंगी मध्य प्रदेश सरकारमधील अतिरिक्त प्रमुख सचिव- वित्त श्री. अजित केसरी यांनी मध्य प्रदेश सरकारच्या सोशल स्टॉक एक्सचेंज फ्रेमवर्कअंतर्गत निष्कर्षावर आधारित निधी उभारणीशी संबंधित मध्य प्रदेश सरकारच्या सोशल इम्पॅक्ट बाँड उपक्रमाबद्दल आपले विचार मांडले. संशोधनाच्या मदतीने सेवा वितरणाच्या नव्या आणि नाविन्यपूर्ण यंत्रणेचा अवलंब करण्यात मध्य प्रदेश सरकार आघाडीवर आहे. सोशल इम्पॅक्ट बाँड्सची अमलबजावणी करण्यासाठी आम्ही आरोग्यसेवा आणि अर्थार्जन क्षेत्रातल काही प्रकल्प निवडले आहेत व सोप्या आणि सहज मोजता येईल अशा पद्धतीचे आउटकम मेट्रिक्स तयार केले आहेत. राज्य सरकारला या यंत्रणेच्या माध्यमातून एसएसई नोंदणीकृत एनपीओसाठी व्यापक संधी प्रदान करता येतील. (National Stock Exchange)

ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशनचे सह- संस्थापक आणि बेन कॅपिटल इंडियाचे अध्यक्ष, सएसई समितीचे सदस्य श्री. अमित चंद्रा म्हणाले, ‘सामान्य भारतीय त्यांच्या बंधूभगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहेत आणि म्हणूनच त्यांना चालना देण्यासाठी आणि नजीकच्या भविष्यात विकास करण्यासाठी सोशल स्टॉक एक्सचेंज ही चांगली संकल्पना आहे. यापूर्वी गेल्या दशकभरातील जगातील प्रत्येक सोशल स्टॉक एक्सचेंज अपयशी झाला आहे, मात्र यामध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. यामुळे शेकडो- हजारो लिस्टिंगच्या शक्यता भारतीय सामाजिक नफा संस्थांसाठी भांडवल उभारणीचे लोकशाहीकरण करतील. ’ (National Stock Exchange)

सध्या एनएसई एसएसई प्लॅटफॉर्मवर ३९ नोंदणीकृत ना- नफा संस्था आहेत आणि त्यामध्ये काही एनपीओजनी यापूर्वीच शिक्षण, कौशल्यविकास, शेती, आदिवासी शेतकऱ्यांची गरीबी दूर करणे यासाठी निधी उभारणी प्रक्रिया सुरू केली आहे. यापुढेही कित्येक इतर एनपीओजनी एसएसई प्लॅटफॉर्मद्वारे निधी उभारण्यात रस दाखवला आहे. (National Stock Exchange)

हेही वाचलंत का?

Back to top button