PM Modi : विजयाचे शिल्पकार पंतप्रधान मोदींचे संसदेत जोरदार स्वागत | पुढारी

PM Modi : विजयाचे शिल्पकार पंतप्रधान मोदींचे संसदेत जोरदार स्वागत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दमदार विजयाचा आनंदोत्सव भाजपने आज (दि.४) संसदेमध्येही साजरा केला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आलेल्या पंतप्रधान मोदींचे भाजप खासदारांनी जोरदार स्वागत केले. मोदी, मोदी असा सातत्याने झालेला गजर, भारत माता की जय… अशी घोषणाबाजी आणि तब्बल तीन मिनिटे चाललेला टाळ्यांचा कडकडाट ….मंद स्मित करून पंतप्रधान मोदींनी या स्वागताचा केलेला स्विकार आणि या प्रकाराकडे हतबलतेने पाहणारे विरोधक हे या स्वागताचे वैशिष्ट्य होते. PM Modi

लोकसभेचे कामकाज सकाळी अकराला सुरू होण्याच्या पंधरा मिनिटे मिनिटे आधी पंतप्रधान मोदींनी सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासोबतच भाजपच्या खासदारांची घोषणाबाजी सुरू झाली. सर्व खासदारांसोबतच केंद्रीय मंत्री देखील टाळ्यांचा कडकडाट करताना, बाके वाजवताना आणि घोषणा देताना दिसले. उत्साही खासदारांनी, तिसरी बार मोदी सरकार तसेच बार बार मोदी सरकार या नव्या घोषणाही दिल्या. यावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया संयत स्वरुपाची होती. या घोषणाबाजीला फारसा प्रतिसाद न देता ते पहिल्या रांगेत शेजारी बसलेले  संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याशी ते गप्पा मारताना दिसून आले. PM Modi

हेही वाचा  

Back to top button