नौदलातील पदांना भारतीय नावे, तर गणवेशावर शिवमुद्रा : पीएम मोदींची मोठी घोषणा | पुढारी

नौदलातील पदांना भारतीय नावे, तर गणवेशावर शिवमुद्रा : पीएम मोदींची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंधुदुर्ग येथील तारकर्ली येथे आज (दि. ४)नौदल दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तारकर्ली येथे आज (दि. ४) नौदल दिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी भाजप नेते नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते यांची उपस्थिती होती. यावेळी पीएम मोदींनी नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार अशी घोषणा केली.

भारतीय नौसेना आपला वर्धापन दिन मालवण येथील सिंधुदुर्ग किनारा किल्ल्याजवळ मोठ्या दिमाखाने साजरा करत आहे. यावेळी बोलत असताना पीएम मोदी म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री मार्ग किती महत्त्वाचा असतो हे माहिती आहेच. समुद्री  हे माझं भाग्य आहे की, नौसेनाच्या ध्वजावरील राजमुद्रेचं आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले हे माझ्य भाग्य आहे. दरम्यान त्यांनी यावेळी एक महत्त्वपूर्ण घोषणा देखील केली.. नौदलातील पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार अशी घोषणा पीएम मोदींनी यावेळी केली. तसेच नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार असे देखी त्यांनी सांगितले.

आपल्या समुद्र तटीय क्षेत्रातील लोकांचा विकास थांबलेला होता. २०१४ नंतर भारतात मत्स्य. उत्पादन वाढलेलें आहे. मच्छिमारांना किसान कार्डचा देखील लाभ मिळाला आहे. समुद्री किनाऱ्यावर नवे उद्योग आणि व्यवसाय वृद्धी होईल यासाठी आपले सरकार प्रयत्न करत असल्याचे पीएम मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा

 

Back to top button