नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान विभागाने नागपूर, विदर्भासह राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. एकीकडे प्रशासन हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीत गुंतले असताना नागपुरात आज पावसाळी वातावरण आहे. पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस व वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात नमूद केले आहे. शनिवारपासून विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. Nagpur Rain
यासोबतच राज्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. एकीकडे नोव्हेंबर महिना शेवटच्या टप्प्यात असला तरी यंदा फारशी थंडी पडलेली नाही. आता कुठे थंडी जाणवत असताना पावसाळी वातावरणाने सर्दी,खोकला अशा प्रकृतीच्या तक्रारी वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात ढगाळ वातावरण, पाऊस व काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात असे वातावरण राहण्याची शक्यत आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागात पावसाचे संकेत आहेत. यासोबतच रविवारी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागातही गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Nagpur Rain
हेही वाचा