जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व ; भाजप दुसऱ्या तर अजित पवार गट तिसऱ्या स्थानी | पुढारी

जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व ; भाजप दुसऱ्या तर अजित पवार गट तिसऱ्या स्थानी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये शिंदे गटाने बाजी मारली असून शिंदे गटाला सर्वांधिक जागा मिळाल्या आहेत. तर त्यापाठोपाठ भाजपने दोन नंबरचे व अजित पवार गटाने तीन नंबरचे स्थान मिळवले आहे. तर, जिल्ह्यातील अमळनेर, जामनेर व जळगाव ग्रामीण या मतदार संघातील नामदारांनी आपापल्या गटात आपापले वर्चस्व कायम ठेवलेले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी 77.73 टक्के मतदान झाले. तर 31 पोट निवडणूकांसाठी ७३.०२ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक निकालाची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून दोन नंबरला भाजपाने तर तीन नंबरला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने बाजी मारली आहे.

जिल्ह्यात शिंदे गट 63, राष्ट्रवादी 11, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 22, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तीन, काँग्रेस चार, प्रहार एक, अपक्ष १६६ जागा असा निकाल लागला. जिल्ह्यातील  अमळनेर, जामनेर व जळगाव ग्रामीण या मतदार संघातील नामदारांनी आपापल्या गटात आपापले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. अमळनेर मध्ये 14 पैकी 11 अजित पवार गटाच्या जामनेर मध्ये 17 पैकी 16 जागा भाजपच्या तर ग्रामीण जळगाव ग्रामीणमध्ये 32 पैकी 28 शिंदे गट असे वर्चस्व राखले आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत 147 सरपंच व १०५३ सदस्य पदासाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यापैकी 15 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. यासाठी 566 मतदान केंद्रांवर 77.73 टक्के मतदान झाले. यामध्ये 248570 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून  129768 पुरुष व 118802  महिला इतक्या मतदारांनी मतदान केलेले आहेत.

पोट निवडणुकीमध्ये 79 ग्रामपंचायतीच्या जागांसाठी निवडणूक होतील. प्रत्यक्षात 31 जागांसाठी मतदान झाले. यात दोन सरपंच व सदस्य पदासाठी 51 जागांसाठी 44 मतदान केंद्रांवर मतदान 73.02 टक्के मतदान झालेले आहे. यामध्ये 18437 मतदारांपैकी 9684 पुरुष, 8753 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. दि. 5 रोजी झालेल्या मतदानांमध्ये सर्वाधिक मतदान जळगाव तालुक्यात 86.05 पारोळा, 85 जामनेर, 82.58 धरणगाव, ८१.५२ यावल, ८१.६७ मुक्ताईनगर, ८१.३२ पाचोरा, 80.30 चाळीसगाव, ८०.०१ रावेर, ७८.६७ भडगाव, ७७.४१ भुसावळ, 76.29 बोदवड, 76.14 अमळनेर, ७६.०७ चोपडा, 69.70 एरंडोल ,68 टक्के मतदान झालेले आहे.

जिल्ह्यामधील 13 जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. यामध्ये 12 ग्रामपंचायत व एक सरपंच पदासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. बोदवड तालुक्यातील धारवाडी गावात एकही सरपंच पदासाठी अर्ज दाखल झालेला नव्हता. 16 ग्रामपंचायत या बिनविरोध निवडल्या गेलेल्या आहेत. यामध्ये भडगाव दोन, अंमळनेर एक, चाळीसगाव दोन, चोपडा दोन, जळगाव दोन, पारोळा 2, यावर एक, धरणगाव चार ग्रामपंचायत बिनविरोध झालेले आहेत.

Back to top button