शरद पवारांचे माझ्यावर प्रेम, म्हणून माझा पहिला नंबर : छगन भुजबळ

शरद पवारांचे माझ्यावर प्रेम, म्हणून माझा पहिला नंबर : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

शरद पवार यांचे माझ्यावर प्रेम आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हा पक्ष उभारणीसाठी त्यांच्यासोबत पहिला नेता मी होतो. बाकीचे नंतर आले, पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत होतो म्हणून पहिला माझा नंबर असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आज शरद पवार यांची सभा होत आहे. त्यासाठी शरद पवार रवाना झाले आहेत. तर छगन भुजबळ नाशिकमध्ये येत आहेत, नाशिकच्या इगतपुरी येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. काही वेळात ते नाशिक शहरात पोहचणार आहेत.

बंडात राष्ट्रवादीचे अनेक आमदार सामील आहेत मग पहिलीच सभा तुमच्या मतदारसंघात का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता छगन भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले शरद पवारांनी जेव्हा पक्षबांधणीला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या सोबत मी सर्वात आधी होतो, पवारांचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणून माझा पहिला नंबर असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

एकीकडे पवार येवल्यात छगन भुजबळांचा आज समाचार घेणार आहेत, तर दुसरीकडे नाशिकमध्ये छगन भुजबऴांचे शक्तीप्रदर्शन होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news