...आणि नवरदेवाच्या डोक्यावर येऊन बसले माकड! | पुढारी

...आणि नवरदेवाच्या डोक्यावर येऊन बसले माकड!

नवी दिल्ली : हे जग खरोखरच विचित्र आहे. इथे कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही. एका दाक्षिणात्य लग्नात लग्नाचे विधी सुरू असताना अचानक एक माकड आले आणि ते नवरदेवाच्या खांद्यावर चढून बसले. त्यानंतर त्याने वधूच्या डोक्यावरून उडी घेत धूम ठोकली. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात टिपला गेला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियातही व्हायरल झाला आहे.

दाक्षिणात्य विवाह परंपरेनुसार, एका विधीमध्ये नवरा आणि नवरी दोघांना एकमेकांच्या समोर बसायचे असते आणि मध्यभागी ठेवलेल्या टोपलीमधील धान्य (प्रामुख्याने तांदूळ) एकमेकांच्या डोक्यावरून खाली सोडायचे असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये नवरा-नवरी हा विधी करत असतात. तेव्हा अचानक एक माकड तेथे येते. नवरदेवाच्या खांद्यावरून डोक्यावर बसायचा प्रयत्न करते. त्यानंतर नवर्‍याच्या डोक्यावरील तांदूळ उचलून धूम ठोकतो. उडी मारत पळून जाताना तो नववधूच्या डोक्यावर टपली मारून जातो. नवरदेव आणि वधूच्या डोक्यावर असलेल्या या धान्याच्या आमिषानेच हे माकड आले होते व जणू काही वधू-वरांना आशीर्वाद देऊनच ते वेगाने निघून गेले! हा सर्व प्रकार पाहून वर्‍हाडी मंडळी तर अवाक् झालीच, शिवाय हा व्हिडीओ पाहणारेही थक्क होत आहेत!

Back to top button