नाशिक : चंद्र आणि शुक्राची अनोखी युती | पुढारी

नाशिक : चंद्र आणि शुक्राची अनोखी युती

नाशिक : पुढारी ऑनलाइन
कपाळावरील चंद्रकोरी प्रमाणे पश्चिम आकाशात दिसणार असा अद्भुत नजारा आज शुक्रवारी, दि. २४ रोजी चंद्र आणि शुक्राची अनोखी युती पहा.

शुक्रवार दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर पश्चिम दिशेला आकाशात आपल्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी खगोलीय घटना पाहायला मिळत आहे. ही अनोखी खगोलीय घटना म्हणजे चैत्र शुकलेच्या तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती होय. आज चंद्र कोरीच्या बरोबर खाली शुक्राची तेजस्वी चांदणी दिसण्याचा विलोभनीय दृश्य अनुभवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रमाणे कपाळावर चंद्रकोर लावत असत, मराठमोळ्या स्त्रिया आपल्या सौभाग्याचे कुंकू म्हणून कपाळावर ज्या प्रमाणे चंद्रकोर लावतात, अगदी तशीच आजची ही चंद्रकोर आणि त्या खाली तेजस्वी शुक्राची चांदणी दिसत आहे. या खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी योग्य वेळ सायंकाळी ७.१५ ते ८:१५ पर्यँत अशी आहे. या वेळेत पश्चिम आकाशात चांगल्या प्रकारे चंद्रकोर पाहायला मिळणार आहे. त्या नंतर चंद्र आणि शुक्राचे तेज मंद होत जाणार आहे. तर लगेच हे दृश्य अनुभवा.

Back to top button