औरंगाबाद: पैठणमधील शासकीय कार्यालयांना 'मराठी भाषा गौरव दिना'चा विसर | पुढारी

औरंगाबाद: पैठणमधील शासकीय कार्यालयांना 'मराठी भाषा गौरव दिना'चा विसर

पैठण: पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याबाबत शासन आदेश असताना पैठण तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचा विसर पडल्याचे चित्र सोमवारी (दि.२७) दिसून आले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या शासन निर्णय २२ जून २०२२ नुसार प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या स्तरावर “मराठी भाषा गौरव दिन” कार्यक्रम आयोजित करून कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा वाचन करून हा मराठी भाषा दिन साजरा करावा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तर सचिव म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे.

मात्र, या समितीने तालुका स्तरावरील तहसीलदार, पंचायत समिती गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, राज्य परिवहन विभाग आदी प्रमुख कार्यालयाला या कार्यक्रमाविषयी सूचना आदेश न दिल्यामुळे पैठण येथील पंचायत समिती, तहसील कार्यालय, पैठण आगार, नगरपरिषद या कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचा विसर पडला की काय? अशी चर्चा नागरिकांतून होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button