औरंगाबाद: अजिंठ्यात अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह | पुढारी

औरंगाबाद: अजिंठ्यात अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

अजिंठा: पुढारी वृत्तसेवा: सिल्लोड तालुक्यातील अजिंठा शिवारातील डोंगरावरील जंगली शहा बाबा दर्ग्याजवळील वाघुर नदीच्या किनारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आज (दि.३१) सकाळी ११ च्या सुमारास नदीच्या काठी गुरे चारणाऱ्यांना हा मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ अजिंठा पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राजू राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शेळके, कोतलकर आदींनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा : 

Back to top button