अजिंठ्यात दाट धुक्याची चादर; पिकांवर रोगराई पडण्याची भीती, शेतकरी चिंतेत! | पुढारी

अजिंठ्यात दाट धुक्याची चादर; पिकांवर रोगराई पडण्याची भीती, शेतकरी चिंतेत!

अजिठा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. कधी कडाक्याची थंडी तर कधी कडाक ऊन, कधी ढगाळ वातावरण अनुभवास येत आहे. यातच आज (शुक्रवार) पहाटे परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याने मनमोहक वातवरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना थंडीपासून बचाव करावा लागत आहे.

पहाटेपासून ते सकाळी १०:३० वाजेपर्यत परिसरात धुक्‍याची चादर पसरली होती. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. रस्ते सुद्धा दिसत नव्हते. धुक्यामुळे अजिठा घाटात वाहनचालकांना पुढील काही दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक संतगतीने सुरू होती. वाहन चालकांना वाहनांचे दिवे सुरू ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता.

वातवरणात सातत्याने बदल होत असल्याने शेती पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंचेत आहेत. बुथवारी परिसरत रात्री पावसाने हजेरी लावल्यानंतर आज (शुक्रवार) सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली. यामुळे सतत बदलणाऱ्या हवामानामुळेपिके आणि फळभाज्यांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button