Sai Tamhankar : फूलमती !❤️?; केसांत गजरा अन् सईचा रेड घागरा लूक…

Sai Tamhankar
Sai Tamhankar

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीसोबत बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या अभिनयासोबत फॅशन सेन्सनं चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो आणि 'इंडिया लॉकडाऊन' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये सई परीक्षक म्हणून काम करत आहे. या सगळ्यासोबत सईच्या नवनवीन फॅशनदेखील चाहत्यांना भूरळ पडली आहे. याच दरम्यान सईच्या आणखी एका हटके फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी खास करून तिच्या स्टाईलचे चाहत्यांना वेड लावले आहे.

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ने सकाळीच तिच्या इंन्स्टाग्रामवर स्टायलिश लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यावेळी फोटशूटसाठी सईने थ्रीपीस निवडला असून रेड कलरचा घागरा, चोळी आणि त्याच रंगाचा कोट परिधान केला आहे. यातील खास म्हणजे, सईच्या ड्रेसवर रंगीबेरंगी फुलांची डिझाईन आणि तिच्या केसांतील गजरा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. केसांची स्टाईल, केसांत गजरा, गळ्यात नेकलेस, हातात अंगठी- ब्रेसलेट, मेकअप आणि लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'फूलमती !' असे लिहिले आहे. सईच्या या फोटोवर काही क्षणातच कॉमेन्टस आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

'तरीच म्हटलं मंडपाला लावतात ते कापड कुठं गेलं ????' 'ब्युटीफुलं??????', 'Saie ma'am tumhi khup chan distay lots of love happiness and respect to you always ❤️❤️', 'Nice photographs ?', 'सुंदर ??❤️', 'my princess ❤️❤️', '❤️ खुप छान', 'Wowwww???', 'Awesome ?', 'फुलराणी ?', 'Elegant फूलमती !❣️?', 'Looking so Beautiful', 'लाल परी', 'फुलवंती', 'Colourful ?❤️', 'Nice pic', 'So cute and very beautiful', 'Lay bharii', 'Wowwww??', 'Beauty ❤️❤️', 'Glamorous baby ??', 'जनू काय सूर्यफूल ❤️❤️नाजुक बाहुली ??', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. याच दरम्यान मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिनेदेखील सईच्या फोटोंचे कौतुक करताना पाच हास्याचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला २ तासांत जवळपास १५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. यासोबत सई सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोज शेअर करून संपर्कात राहत असते.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news