नातू असले म्हणून अक्कल येत नाही; आ. शिरसाटांचा आदित्य ठाकरेंना टोला | पुढारी

नातू असले म्हणून अक्कल येत नाही; आ. शिरसाटांचा आदित्य ठाकरेंना टोला

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आवरण करण्याचा अधिकार नसल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादेत केली होती. त्याला सोमवारी शिंदे गटाच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. बाळासाहेबांच्या मांडीवरही आदित्य ठाकरे बसले नाहीत. नातू असले म्हणून अक्कल येते असे नाही, अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांनी आम्हांला मोठे केले. त्या नावावर आज हे जगाताहेत, असेही शिरसाट म्हणाले.

आ. शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना निवडणूक आयोगासमोरील सुनावणीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या हाती कमान असलेली शिवसेना आहे. निवडणूक आयोगासमोर 30 तारखेला त्याचा फैसला होणार आहे. आयोगाचा निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांना शंभर टक्के धक्का बसणार आहे.

Back to top button