सिल्लोड : शिंदे गटाची बाजी, तालुक्यातील १८ पैकी १३ ग्रामपंचायती ताब्यात; कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांचे वर्चस्व

सिल्लोड : शिंदे गटाची बाजी, तालुक्यातील १८ पैकी १३ ग्रामपंचायती ताब्यात; कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांचे वर्चस्व
Published on
Updated on

सिल्लोड; पुढारी प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील १८ ग्रामपंचायत मतमोजणी पूर्ण झाली असून, सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आज जाहीर झालेल्या निकालात १८ पैकी १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृषीमंत्री अब्दुल सत्तार -शिंदे गटाने बाजी मारली आहे. तर भाजपकडे केवळ ५ गावांचा कारभार मतदारांनी सोपवला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची असलेली एकप्रकारच्या रंगीत तालमीत कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने एकतर्फी वर्चस्वाला गवसणी घातली आहे. भवन गटातील ३ पैकी २ ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर मोठे – इद्रिस मुलतानी यांना यश आले आहे.

सिल्लोड तालुक्यातील १८ गावांच्या ग्रामपंचायत मदत संपलेल्या निवडणुकीसाठी दि.१८ रविवार रोजी मतदान झाले. या निवडणुकीत मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी विक्रमी राहिली आहे. निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी (दि.२०) मंगळवार रोजी शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेत तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात पार पडली. सरपंचपदासाठी निवडून आलेले नवनिर्वाचित गावचे कारभारी याप्रमाणे आहेत.

निवडणूक जाहीर झालेले निकाल व विजयी उमेदवार

  • कासोद धामणी – दत्तात्रेय काशीनाथ राकडे (शिंदे गट)
  • बोरगाव बाजार – सय्यद सत्तार बागवान (शिंदे गट )
  • सारोळा – मोहन गायकवाड (शिंदे गट )
  • जाभंई – लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट)
  • रेलगाव – पंकज जैस्वाल (शिंदे गट)
  • खुल्लोड – स्वाती भागवान भोरकडे (शिंदे गट)
  • जलकी बाजार – ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट)
  • मोढा खुर्द – लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट)
  • पिंपळगाव पेठ – दिलीप जाधव(शिंदे गट)
  • पिंपळदरी – पूजा मोहोर (शिंदे गट)
  • चारनेर – चारनेर वाडी – रविंद्रसिंग बिलावाल राजपूत (शिंदे गट)
  • शिंदेंफळ – रेखाबाई अक्कलवार (शिंदे गट)
  • मोढा बु।। वर्षा संभाजी हावळे (शिंदे गट)
  • बोरगाव कासारी – मिनाबाई कौतीक जाधव (भाजप)
  • निल्लोड – उत्तम शिंदे (भाजप)
  • धोत्रा -पद्माबाई ज्ञानेश्वर जाधव (भाजप)
  • हट्टी – मोहळ -ममता कुलकर्णी (भाजप)
  • सावखेडा खुर्द – सावखेडा बु।। काशिनाथ गोरे (भाजप)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news