औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात | पुढारी

औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी १० वाजता सुरु झाली. सर्वच गटासाठींची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात आली असून यासाठी पहिल्या शिफ्टमध्ये ८० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

या निवडणुकीत अधिसभेच्या २५ व विद्यापरिषदेच्या सहा जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. दोन्ही गटात मिळून तीन जागा बिनविरोध आल्या असून तीन जागा रिक्त राहिल्या आहेत.

तीन जण बिनविरोध

अधिसभेच्या तीन जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवार वैध ठरल्यामुळे या जागा बिनविरोध आल्या आहेत. यामध्ये संस्थाचालक महिला गटातून अर्चना बाळासाहेब चव्हाण (अर्चना रमेश आडसकर), व नितीन उत्तमराव जाधव (अनूसूचित जमाती प्रवर्ग) तसेच (अनूसूचित जमाती प्राचार्य प्रवर्गातून) डॉ. शिवदास झुलाल शिरसाठ हे बिनविरोध निवडून आले आहेत.

मतमोजणीसाठी २४० जणांची नियुक्ती

क्रीडा विभागातील बॅडमिंटन हॉलमध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु झाली. मतमोजणीसाठी तीन सत्रात मिळून ७० शिक्षक, १४० अधिकारी-कर्मचारी तसेच ३० वर्ग चार कर्मचारी अशी २४० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, अधिसभा विद्यापरिषद व अभ्यास मंडळाच्या सर्वच गटातील मतमोजणी सकाळी दहा वाजता एकाच वेळी सुरू करण्यात आली असून दुपारी एक वाजेपर्यंत पहिला निकाल अपेक्षित आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button