श्रीरामपूर : कोरोनातील विधवांना मिळणार शिलाई मशिन

श्रीरामपूर : कोरोनातील विधवांना मिळणार शिलाई मशिन

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा: श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोरोना काळात विधवा झालेल्या गरजू महिलांना भाऊबीजेची भेट दिली जाणार आहे. तालुक्यातील सुमारे 150 महिलांना शिलाई मशिनचे वाटप लवकरच केले जाणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी व शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी दिली आहे.

कोरोनाकाळात तालुक्यात 300 हून अधिक मृत्यू झाले. त्यात सुमारे 300 महिलांना वैधव्य स्वीकारावे लागले. अचानक आलेल्या या संकंटामुळे या दिवाळीत अशा कुटुंबावर दुःखाचे सावट आहे. या संकट समयी त्यांच्या मदतीला श्रीरामपूर भाजपाचे पदाधिकारी भावाप्रमाणे धावून आले आहेत. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या प्रेरणेतून श्रीरामपूर भाजपाच्यावतीने या एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात शहरातील दानशूर व्यापारी, उद्योजक, संस्था यांनी भरभरून मदत केली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हेरंब औटी, शशिकांत कडूस्कर, मिलींदकुमार साळवे, अजित बाबेल, रविंद्र खटोड, भरत साळुंखे, राजेश राठी, चंद्रकांत परदेशी, सुनील चंदन, पियूष दुधेडिया, गोविंद कांदे, साजिद शेख, अक्षय नागरे, नारायण काळे, हंसराज बतरा, विजय आखाडे राबवित आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news