पिंपरी : ...तर पालिका सभागृह, मैदान भाड्यात सवलत, महापालिका आयुक्त सिंह यांचा निर्णय | पुढारी

पिंपरी : ...तर पालिका सभागृह, मैदान भाड्यात सवलत, महापालिका आयुक्त सिंह यांचा निर्णय

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळांची मैदाने, नागरिक, संघटना, संस्था, मंडळ, क्लब, कंपन्यांनी भाड्याने घेतल्यानंतर शून्य कचरा (झिरो वेस्ट-कचरा निर्माण न केल्यास) उपक्रमाचा अवलंब केल्यास त्यांना भाडेशुल्कात 10 टक्के सलवत दिली जाणार आहे. या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.18) मान्यता दिली.

आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये संपूर्ण देशात अव्वल येण्यासाठी पालिकेमार्फत विविध नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळाचे मैदान येथे झिरो वेस्ट मानक कार्यप्रणालीचा अवलंब करून झिरो वेस्ट कार्यक्रम राबविण्यासाठी पालिकेच्या वतीने सूचना दिल्या आहेत. नागरिक, संघटना, संस्था, मंडळ, क्लब, कंपन्यांनी पालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळांची मैदाने भाड्याने घेतल्यानंतर या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून झिरो वेस्ट उपक्रम राबविल्यास त्यांना भाड्यात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे.

आकारणीत सवलत दिली जाईल. त्याला आयुक्तांनी मान्यता दिली. त्याबाबतचे आदेशही आयुक्तांनी काढले आहेत. सभेत विविध विकासकामांसाठी 1 कोटी 61 लाख खर्चास आयुक्तांनी मंजुरी दिली. यमुनानगर, निगडी येथे लाईटहाऊस प्रकल्पाचे आवश्यक स्थापत्यविषयक कामासाठी 29 लाख खर्च आहे. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय पदव्युत्तर संस्थेच्या शस्रक्रिया विभागासाठी आवश्यक हार्मोनिक स्कालपेल खरेदीसाठी 50 लाख खर्च आहे. या खर्चासह तरतूद वर्गीकरणास आयुक्तांनी मंजुरी दिली.

Back to top button