

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : मिरज कोल्हापूर मार्गावर रेल्वेच्या (Railway) अनागोंदी कारभाराबाबत खासदार धैर्यशील माने यांनी मागणी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी १८ रोजी दुपारी तीन वाजता पुणे मंडल रेल्वे कार्यालयात तातडीने बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीला रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्व खासदारांना निमंत्रित केलेले आहे. रेल्वेचे महाप्रबंधक खास करून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षभरापासून मिरज ते कोल्हापूर मार्गावरील भुयारी रेल्वे मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे वाटेल तशा पद्धतीने भुयार मार्ग खोदून कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे मार्गावरील अनेक रस्ते बंद झालेले आहेत अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे या विरोधात जनतेतून उद्रेक सुरू झाल्यानंतर याची गंभीर दाखल घेत पुणे रेल्वे विभागाने या संदर्भात अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच रेल्वेच्या इतर समस्याबाबत विभागातील सर्व खासदारांची बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला खासदार धैर्यशील माने संजय मंडलिक धनंजय महाडिक यांच्यासह सोलापूर रेल्वे विभागातील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे कोल्हापूर सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेली आहे. (Railway)
केंद्रीय रेल्वे समितीची नव्याने रचना करण्यात आली असून या समितीवर महाराष्ट्रातून लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून खासदार धैर्यशील माने तर राज्यसभेमधून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची निवड केली आहे यांच्यासह लोकसभेचे 21 तर राज्यसभेच्या 10 खासदारांना प्रतिनिधित्व दिले आहे पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि धैर्यशील माने यांना संधी मिळाल्यामुळे कोल्हापूर सांगली मिरज सातारा सोलापूर आदी मार्गावरील रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झालेले आहेत.
हेही वाचा