औरंगाबाद : नाथसागर धरणाचे आपत्कालीन दरवाजे झाले बंद; १८ दरवाजे मात्र चार फूट उघडेच | पुढारी

औरंगाबाद : नाथसागर धरणाचे आपत्कालीन दरवाजे झाले बंद; १८ दरवाजे मात्र चार फूट उघडेच

पैठण ; पुढारी वृत्तसेवा:  पैठण येथील नाथसागर धरणाचे दरवाजे शुक्रवारी (दि.२) उघडण्यात आले होते. यातील आपत्कालीन दरवाजा क्र २ ते ८ हे आज दुपारी 12 वाजता पुन्हा बंद करण्यात आले. सध्या १८ दरवाजे चार फूट खुले ठेवले असून, गोदावरी नदी पात्रात ७५ हजार ४५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

शुक्रवारी (दि.२) नाथसागर धरणाच्या वरील भागातून दिवसभर प्रचंड वेगाने धरणात पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या धरण प्रशासनाने रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान धरणाचे आपत्कालीन दरवाजे खुले करून गोदावरी नदीत २५ दरवाजातून विसर्ग सोडण्यात आला होता. परंतू आज (शनिवार) सकाळपासूनच धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावल्याने धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी उघडलेली आपत्कालीन २ ते ८ या क्रमांकाचे दरवाजे दुपारी बारा वाजता पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला.

गोदावरी नदीत सध्याच्या परिस्थितीत १८ दरवाजे चार फूट उघडे ठेवून ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता धरण नियंत्रण कक्षात नोंद केल्यानुसार एकूण पाणीसाठा २८७७. ९९० असून, वरील धरणातून ६८ हजार ४१६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची टक्केवारी ९८.५७ एवढी झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button