नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम | पुढारी

नाशिक : खाकीसह नागरिकांचाही 75 किमीच्या दौडमधून सलाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित 75 किमी पोलिस दौडमध्ये रविवारी (दि. 14) चौथ्या टप्प्यात पोलिसांसह नागरिकांनी 10 किमी अंतर धावून दौड पूर्ण केली. कवायत मैदान येथे आ. सीमा हिरे, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक राजेश मोर, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते चौथ्या टप्प्यातील दौडला झेंडा दाखविण्यात आला. या दौडमध्ये पोलिस अधिकारी – कर्मचारी यांच्यासह नाशिककरांनीही सहभाग नोंदविला. आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

12 धावपटूंचा सत्कार : दौडमध्ये सहभागी झालेल्या सहा पुरुष व सहा महिलांना पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात गोरख जाधव, सूरज गुरव, नंदू उगले, संतोेष जाधव, समाधान पवार, धीरज महाले, रोहिणी बनकर, सविता गर्जे, प्राची कर्णे, कविता भोईर, आरती भवर, पल्लवी मेधने यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button