उजनीची पातळी 55 टक्केवर | पुढारी

उजनीची पातळी 55 टक्केवर

बेंबळे : पुढारी वृत्तसेवा :  उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे दौंड धरणातून उजनी धरणात येणार्‍या आवकेत आहे. बुधवारी (दि. 20) सकाळी दौंडचा विसर्ग 21,525 क्युसेक होता. त्यामध्ये वाढ होवून आज संध्याकाळी 27171 क्युसेक विसर्ग सुरू आहे. अन्य आठ धरणांतून 19 हजार 259 क्यूसेकची उजनी धरणात आवक सुरू आहे. त्यामुळे उजनी धरण आता 55 टक्केवर पोहोचले आहे. दरम्यान उजनी धरणातून नदी व बंधारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांचे लक्ष उजनीतील पाणीसाठ्यावर लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने दोन दिवसांपासून ओढ दिली तरी पुणे जिल्ह्यातील होणार्‍या पावसाने सोलापूरकरांना दिलासा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील बंडगार्डन व दौंडमधून येणार्‍या प्रवाहात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनीवर अवलंबून असलेल्या शेतकर्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणार्‍या 19 धरणांपैकी आत्तापर्यंत दहा धरणे शंभर टक्के झाली आहेत.एक धरण नव्वद टक्के वर आलेले आहे. केवळ राहिलेली आठ धरणे 50 ते 70 टक्के च्या घरात आहेत त्यामुळे भीमाशंकर माथ्यावर पडलेला पाऊस हा थेट या एकोणीस धरणातून पुढे बंडगार्डन आणि दौंड या मार्गातून आपल्या उजनीत मिळणार आहे

याशिवाय अन्य येडगाव (2183 क्यूसेक), वडज ( 934), घोड (7440), कलमोडी (674), चासकमान (6435) वडीवले (736), आंध्रा (722), भामा आसखेड (135) अशा आठ धरणांतून एकूण 19259 क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

Back to top button