जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा | पुढारी

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

महाड ; प्रतिनिधी : कोरोना काळातील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी ‍भाजपच्या महाडमधील पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्‍या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेशानुसार रायगड जिल्ह्यात कोरोना काळातील तिसऱ्या स्तराचे निर्बंध जारी आहेत. त्यामध्ये कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लग्न वाढ दिवस सामाजिक व राजकिय सभा समारंभात गर्दी टाळण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

बंदी आदेश असतानाही भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड पिजी सिटी येथे १०० ते १५० कार्यकर्ते जमा करून शासन निर्देश व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ : परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण 

 

Back to top button