पंढरपूर : कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत पालखी व दिंडी सोहळा उत्साहात | पुढारी

पंढरपूर : कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत पालखी व दिंडी सोहळा उत्साहात

पंढरपूर,पुढारी वृत्‍तसेवा : विठुरायांच्या गजरात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाजांच्या नावाचा जयघोष केला. श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित संस्कार जपणारी व मुलांमध्ये संस्कार रुजविणारी अशी ओळख असणारी कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला पंढरपूर येथे मंगळवारी पालखी सोहळा उत्साहात साजरा केला.

यावेळी पालकांच्या हस्ते संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करुन हरिनामाच्या गजरात दिंडीचे प्रस्थान झाले. वांगीकर नगर-स्वामी समर्थ मंदिर परिसर-नागालँड हॉटेलमार्गे दिंडी विद्यानिकेतन येथे पोहोचली. यावेळी नागरिकांनी दिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले. विद्यानिकेतनच्या मैदानावर गोल रिंगण सोहळा पार पडला.

Back to top button