गवती चहाची मागणी वाढली | पुढारी

गवती चहाची मागणी वाढली

पिंपरी : कोरोना रुग्णांची वाढ आणि पावसाळ्याची चाहूल लागल्यामुळे गवती चहाला मागणी वाढली आहे. बाजारात गवती चहा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

जून महिना सुरू झाल्याने पावसाळ्यात साथीच्या रोगांना वाव मिळतो. त्यात कोरोना रूग्ण वाढ असल्याने गवती चहाची आवक बाजारात झाली आहे. गवती चहाच्या पानांची जुडी 10 रुपयांला मिळत असून कोरोना प्रतिबंध काढ्यात, ब्लॅक टीमध्ये गवती चहाचा उपयोग जात असल्याने भाव वधारला आहे. गवती चहामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. गवती चहा पाचक म्हणून वापरला जातो. तसेच, तेलाचा वापर त्वचाविकारावर करतात. सर्दी पडश्याच्या काळात गवती चहाचा काढा हा उत्तम उपाय असतो.

पावसाळ्यात चहाला प्रचंड मागणी असते. तसेच, साथीच्या आजारांवर उपाय म्हणून गवती चहाचा काढा उपयुक्त असतो. बाजारात मागणी वाढल्याने दरात दुप्पटी-तिप्पटीने वाढ झाली आहे.

Back to top button