तलवारीचा धाक दाखवून सराफावर हल्‍ला ; लाखोंच्या दागिन्यांची लूट | पुढारी

तलवारीचा धाक दाखवून सराफावर हल्‍ला ; लाखोंच्या दागिन्यांची लूट

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  कुद्रेमानी येथील सराफी दुकान बंद करून आपल्या गावी बेळगुंदी येथे जाणार्‍या सराफ व्यवसायिकाला दोघा लुटारूंनी तलवारीचा धाक दाखवत लुटले. त्यांच्याकडे असलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याचा दावा संबंधित सराफाने केला आहे. परंतु, याची अद्याप पोलिसांत नोंद झाली नसल्याने नेमक्या लुटीची माहिती समजू शकली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सराफ व्यवसायिक सुभाष वामन काकतीकर (वय 55, रा. बेळगुंदी) यांच्या मालकीचे कुद्रेमानी येथे सराफी दुकान आहे. दिवसभर व्यवसायानंतर दररोज रात्री आठ वाजता ते गावी बेळगुंदीला जातात. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे सोनोली मार्गे बेळगुंदीला जात असताना कुद्रेमानीजवळ समोरून येणार्‍या दोघा लुटारूंनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांनी तलवारीचा धाक दाखवत काकतीकर यांच्याकडील दागिन्यांची बॅग काढून घेतली. यावेळी लुटारू व त्यांच्यात झटापट झाली. तेव्हा लुटारूंनी त्यांच्या हेल्मेटवर तलवारीचा वार केल्याचे सांगण्यात येते त्यांचे हेल्मेट एकीकडे पडले होते, तर दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

याबाबत काकती पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की घटना घडली आहे. परंतु, नेमके किती दागिने चोरीला गेले आहेत, याची अद्याप कल्पना आलेली नाही. शिवाय सराफ व्यवसायिकाला कुठेही जखम नसून दुचाकीची फक्त शीट फाटलेली आहे. 80 तोळे दागिने चोरीला गेल्याचे सराफ व्यवसायिकाचे म्हणणे आहे. परंतु, रात्रीच्या वेळी आडवाटेने इतके दागिने घेऊन ते कसे जाऊ शकतात? असा प्रश्‍न पोलिसांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याची रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. ज्या दिशेने लुटारू पसार झाले, त्याचाही माग घेण्याचा प्रयत्न केला. काकतीचे निरीक्षक गुरूनाथ एस. व उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

फक्त शीट फाटलेली आहे. 80 तोळे दागिने चोरीला गेल्याचे सराफ व्यवसायिकाचे म्हणणे आहे. परंतु, रात्रीच्या वेळी आडवाटेने इतके दागिने घेऊन ते कसे जाऊ शकतात? असा प्रश्‍न पोलिसांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याची रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. ज्या दिशेने लुटारू पसार झाले, त्याचाही माग घेण्याचा प्रयत्न केला. काकतीचे निरीक्षक गुरूनाथ एस. व उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Back to top button