भाज्या फ्रेश ठेवण्यासाठी खास टिप्स | पुढारी

भाज्या फ्रेश ठेवण्यासाठी खास टिप्स

पुढारी ऑनलाईन

प्रत्येक सिजनमध्ये पालेभाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे गरजेचे असते. यासाठी काही ठराविक काळजी घेणे गरजेचे असते. पण भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याच्या काही पद्धती असतात. या पद्धतींमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला ताज्या आणि फ्रेश भाज्या बनवून खायला घालू शकता. ताज्या भाज्या खाल्याचा फायदा तुमच्या शरिरालाही होतो.

yes देठे कापावी

विशिष्ट भाज्या पालेभाज्या फ्रिजमध्ये ठेवताना त्यांची देठे कापावी. आणि त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. पाणी नितळल्यानंतर कापडाने भाजी कोरडी करून ठेवावी. दोन दिवसांपेक्षा जास्त काळ भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होतात.

yes फ्लॉवर

फ्लॉवर प्रिझर्व्ह करण्यासाठी तो एअर टाइट पॉलिथिन बॅगमध्ये बांधून ठेवावा. फ्लॉवरमधून मॉइश्चर निघून जात नाही. फ्लॉवर सेपरेटली ठेवण्याची गरज नसते, पण बॅगमध्ये व्यवस्थित बांधून ठेवणे मात्र गरजेचे असते.

yes कांदे

बऱ्याचवेळेस आपल्याकडून गरजेपेक्षा जास्त कांदा चिरला जातो. अशावेळी कांदा जास्त वेळ ठेऊ नये. ठेवलाच तर तो बंद प्लास्टिक कॅनमध्ये ठेवावा. दुसऱ्या दिवशी पटकन वापरून तो लगेच संपवावा. कोणत्याही झाकणाशिवाय कांदा तसाच रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ नये. कांदा फ्रिजमध्ये तसाच ठेवल्याने फ्रिजमधील इतर पदार्थांनाही कांद्याचा वास लागतो.

yes वांगी

कापलेल्या वांग्याचे तुकडे राहिल्यास एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस आणि चिमुटभर हळद मिक्स करा. आणि हे मिश्रण वांग्याच्या तुकड्यावर शिंपडून मग ते फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे वांग्याचे तुकडे फ्रेश राहतील आणि त्यांचा रंगही बदलणार नाही.

yes कंदमुळे

कंदमुळे आहेत तसे रेफ्रिजरेटरमध्ये आपण ठेऊ शकत नाही. यासाठी एका डब्यात पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये कंदमुळ्यांचे तुकडे टाका. ते दुसऱ्या दिवशी वापरून संपवण्याचा प्रयत्न करा. जास्त दिवस ठेऊ नका.

yes काकडी

काकडी एअर टाइट डब्यात ठेवा. हा डबा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशापद्धतीने काकडी ठेवल्यास त्या फ्रेश राहतात.

Back to top button