Attack
Uncategorized
पिंपरी : पादचारी तरुणावर तलवारीने वार
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 'पादचारी तरुणाला रस्त्यात अडवून कोयता आणि तलवारीने वार करत त्याच्याकडील 52 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला.
ही घटना गुरुवारी (दि. 7) आकुर्डी येथे घडली. सागर दामाजी वाघमारे( 36, रा. रावेत, पुणे) यांनी गुरुवारी (दि. 7) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास फिर्यादी हे रावेत येथील घरी चालले होते.
दरम्यान, ते लिंक रोड आकुर्डी येथे आले असता दुचाकीवरून चार चोरटे तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या पाठीवर कोयता आणि तलवारीने वार करून त्यांना जखमी केले.
त्यानंतर फिर्यादी यांच्याकडील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, एक मोबाइल आणि रोख पाच हजार रुपये असा एकूण 52 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तपास निगडी पोलिस करीत आहेत.

