पिंपरीमध्ये भाजपला आणखी एक धक्का | पुढारी

पिंपरीमध्ये भाजपला आणखी एक धक्का

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकीची तयारी सुरू असताना सत्ताधारी भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

मोशी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी बुधवारी (दि.16) नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रवादी काँग्रेस की इतर पक्षात प्रवेश करतात यांची उत्सुकता लागली आहे.

आमचे साहेब कुटूंब वत्सल : प्रतिक जयंत पाटील

त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर केला आहे. बोराटे म्हणाले की, मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यात अपयश आले.

जाधववाडी व मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. ते झाले नाही. त्यामुळे विकासकामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत.

ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई होणार?; लग्नपत्रिका व्हायरल

त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, या पूर्वी भाजप संलग्न अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,

भाजप नगरसेविका माया बारणे याचे पती संतोष बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर, भाजपचे काही  नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

 

Back to top button