

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपळे गुरव येथे घराजवळ उभी केलेली सुमो गाडी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २८) रात्री साडेबारा ते शनिवारी (दि. २९) सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत दत्तकृपा बिल्डींग, पिंपळे गुरव येथे घडला. प्रमोद बाबू कदम (४०, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी घराजवळ पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कदम यांची सुमो गाडी चोरून नेली. तसेच कदम यांच्या शेजारील नवीन इमारतीमधून ३० हजाराचे साहित्य चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपास सांगवी पोलिस आहेत.